कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग संचलित न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, उंचगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय प्रश्नामंजुषा स्पर्धेत डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूरच्या सानिका पाटील आणि पुजा पाटील यांच्या संघाने स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेत राज्यभरातून २० हून अधिक औषधं निर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या सानिका पाटील, पूजा पाटील, प्रियांका परीट आणि अलि बालोरगी यांच्या दोन संघांनी यात सहभाग नोंदवला होता. सहभागी विद्यार्थ्यांना प्रश्नाची चिठ्ठी देऊन नाविन्यपूर्ण पद्धतीने स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. मुलांचा बौध्दिक विकास, फार्मसी विषयाची गोडी आणि जिज्ञासा यासाठी प्रश्नमंजुषा उपक्रम लाभदायक असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष विजेंद्र पाटील यांनी केले.

या स्पर्धेत सानिका आणि पुजा यांनी अतिशय समर्पक उत्तरे देत द्वितिय क्रमांक पटकावला. मान्यवरांच्या हस्ते त्याना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी फिल्म तयार करणे तसेच लोगो तयार करणे आदी स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या. या विद्यार्थीनीना डॉ. केतकी धने आणि प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे यांचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आ. सतेज पाटील, विश्वस्त आ. ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.