प्रतिनिधी ( कसबा बावडा ) 27 नोव्हेंबर 2023 रोजी त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त पंचगंगा घाटावर मोठ्या उत्साहत दीपोत्सव साजरा करण्यात आला. दिपोत्सवासाठी कोल्हापुरासाठी हजारो भाविकानी उपस्थित राहून घाटावर दिप लावुन मनोभावे पूजा केली. यावेळी हजारो पणत्यांच्या प्रकाशाने यावेळी पंचगंगा घाट उजळून निघाला होता.


दिपोत्सवानंतर माती आणि मेणाच्या पणत्या, निर्माल्य आणि घनकचरा घाट परिसरात निर्माण झाला होता. डी.वाय.पाटील अभियांत्रिकीच्या एन.एस.एस स्वयंसेवकांनी येथील सर्व कचरा गोळा करून स्वच्छता केली. या मोहिमेला कोल्हापूर महानगरपालिकेचे सहकार्य लाभले.


संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील यांचे या उपक्रमासाठी प्रोत्साहन तर कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे यांचे सहकार्य मिळाले.

अधिष्ठाता व जिमखाना विभागप्रमुख डॉ. राजेंद्र रायकर, एन. एस. एस. प्रकल्प अधिकारी योगेश चौगुले, तुषार आळवेकर यांच्यासमवेत संकेत घाटगे, निकिता सावंत, सिद्धि पतकी, तनिषा मदाने, श्रेय वाघ, अथर्व गगाने, गौरव चौगले, अथर्व ढेरे यांनी विशेष परिश्रम घेतले.