कुरुंदवाड (प्रतिनिधी) : ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत वायू प्रदूषण कमी करण्यासाठी नॉनमोटराईजड वाहतुकीस प्रोत्साहन देण्यासाठी कुरुंदवाड पालिका व लॉयन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आज (शनिवार) शहरातून सायकल रॅली काढण्यात आली. कृष्णाघाट स्मशनभूमी व नदी परिसराची स्वच्छता करून वृक्षारोपण करत अभियानाचा समारोप करण्यात आला.

येथील पालिका चौकातूनन रॅलीला सुरवात झाली. नगराध्यक्ष दीपक गायकवाड, प्रांतपाल सुनील सुतार, नगरसेवक अक्षय आलासे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी आरोग्य अभियंता प्रदीप बोरगे यांनी स्वच्छतेची शपथ दिली.

सुनील सुतार म्हणाले की, पंचतत्त्वांवर आधारित उपाययोजना करुन निसर्गपूरक जीवनपध्दती अवलंबिण्यासाठी ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविण्यात येत आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात वृक्षारोपण करून आरोग्याबाबत पालिकेच्या सूचनांचे पालन करून अभियान यशस्वी करण्यात सहभाग नोंदवा, असे आवाहन केले.

पालिका चौकातून रॅलीला सुरवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सन्मित्र चौक, नवबाग रस्ता ते कृष्णा घाट येथे रॅलीचा समारोप झाला. घाट परिसरात वृक्षारोपण, नदी, घाट व स्मशनभूमी परिसरातील स्वच्छता करण्यात आली.

यावेळी नगरसेवक डॉ. सुनील चव्हाण, रविकिरण गायकवाड, नंदकुमार सुतार, सागर पट्टेकरी, डॉ. अमितकुमार सुतार, इसाक घोरी, रितेश शहा, अमोल कांबळे, नंदकुमार चौधरी, अभिजित कांबळे, रिजवान मतवाल, आनंदा शिंदे आदी उपस्थित होते.पालिका कार्यालय निरीक्षक पूजा पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तर राजेंद्र गवळी यांनी आभार मानले.