कोल्हापूर (प्रतिनिधी) : दुधाळी पॅव्हेलियन येथे नवीन कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या कोविड केअर सेंटरच्या उभारणीच्या कामाची आयुक्तांनी पाहणी केली. ५० बेडचे हे कोविड केअर सेंटर सर्व सुविधायुक्त करण्यावर अधिक भर असून सर्व संबंधितांनी सेंटरच्या उभारणीचे काम अधिक गतीने करावे,’ अशी सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केली.
नगरसेवक प्रतापसिंह जाधव यांच्या पुढाकाराने व लोकसहभागातून दुधाळी पॅव्हेलियन येथे नवीन न केअर सेंटर उभारण्यात येत आहेत. हे केंद्र लवकरात लवकर सुरु करण्याच्याद्ष्टीने महापालिका प्रशासन आणि नगरसेवक प्रतापसिंह जाधव यांचे प्रयत्न आहेत. या कोविड केअर सेंटरचे कपिल अधिक यांच्यामार्फत मोफत पेंटिंग करून देण्यात येत आहे. ही समाधानाची बाब असून नगरसेवक प्रतापसिंह जाधव यांच्या पुढाकाराने व लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या या कोविड केअर सेंटरसाठी इच्छुक व्यक्ती, संस्थांनी नगरसेवक प्रतापसिंह जाधव ९८२२६०४०३० यांच्याशी संपर्क साधून आवश्यक ती मदत करावी, असे आवाहन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे. यावेळी नगरसेवक प्रतापसिंह जाधव, सहाय्यक आयुक्त चेतन कोंडे, कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले, उमेश माने आदी उपस्थित होते