कोल्हापूर (प्रतिनिधी) :  राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १० हजार कोटींची मदत जाहीर केली, याचे स्वागतच आहे. मात्र, ही मदत नुकसानीच्या तुलनेत तोकडी आहे. त्यामुळे राज्य सरकार तसेच विविध पक्षांनी भरीव निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा. अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.