मुंबई (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करायचे नाही. केंद्राकडे राज्याचे देणे बाकी आहे. येणे आले तर हात पसरावे लागणार नाही. विरोधकांनी त्यावर राजकारण करत बसू नये. शेतकऱ्यांसाठी जे जे करावे लागेल ते करू. दोन-चार दिवस दौरे करणार आहे. माहिती घेत आहे. त्यानंतर शक्य तेवढी मदत करू. हे तुमचं सरकार. शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. त आज (सोमवारी) सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले की, अतिवृष्टी होऊ नये ही माझी प्रार्थना करत आहे. पंचनामे सुरू आहेत. माहिती घेत आहे .माहितीचा अभ्यास करत बसणार नाही. कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. गरज पडल्यास केंद्राकडे मदतीसाठी निधीची मागणी करू. पाण्याचा अनपेक्षित लोंढा आला. ७० वर्षानंतर प्रचंड पाणी आले. पूर रेषा लक्षात ठेवून पुनर्वसन करू. अतिवृष्टीचा इशारा कायम आहे. गाफील राहू नका. हे शेतकऱ्यांचे आणि जनतेचे सरकार आहे. आपत्ती मोठी आहे. धोका कायम आहे. सावध राहा.