पन्हाळा : (प्रतिनिधी ) लोकसभेच्या हातकणगले मतदार संघात येणाऱ्या पन्हाळा तालुक्यातील १ लाख ३९ हजार ३७७ मतदारांसाठी एकूण १४६ मतदानकेंद्रावर मतदान पार पडले. आज पर्यंतच्या इतिहासातील हि पहिलीच लोकांसाभा निवडणूक गटातटाच्या पातळीवर लढली गेल्याने मतदानाचा टक्का वाढला आहे. पण सुरवाती पासूनच ग्रामीण भागात उत्साहाने मतदार मतदानास बाहेर पडले होते.तर सुर्वातीला शहरीभागातील मतदारांमध्ये तितकासा उत्साह दिसत नव्हता पण दुपारनंतर तेथेही रांगा दिसू लागल्या त्यामुळे पन्हाळा तालुक्यात सर्वत्रच मतदानात चांगला प्रतिसाद मिळत असलेचे चित्र होते.

लोकसभेच्या हातकणगले मतदार संघात २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.पण खरी लढत हि धैर्यशील माने,सत्यजित पाटील व राजु शेट्टी या तिघातच होताना दिसत आहे. ही निवडणूक प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या मुद्द्यावर लढली गेली. पन्हाळा तालुक्यात सुरवातीला स्थानिक उमेदवार व पक्षफुटीची सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न या मुद्द्यावरून झालेल्या आरोप प्रत्यारोपाने निवडणुकिला रंगत आली होती.पण जसजशी मतदानाची तारीख जवळ येत गेली तसतसे निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे बदलत गेले.जरी मुद्दे बदलत गेले तरी मुळचे मुद्दे मात्र प्रचारात कायम राहिले होते.

आत्तापर्यंत लोकसभा निवडणूक हि वरिष्ठ नेत्यांच्या सुचने वरूनच होताना दिसत होती.मात्र पहिल्यांदाच आत्ताची खासदारकीची निवडणूक गटातटाच्या पातळीवर आलेची दिसून आली.तिचा हा प्रवास जाती धार्मा वरून स्थानिक आमदारांचे मार्गे गाव पतीळीवरील गटातटा पर्यत पोहोचला.त्यातच सोशल मिडीयाचाही मोठ्या प्रमाणात वापर झाला.त्यातून अगदी ग्रामपंचायत सदस्या पासून थेट देशाच्या पंतप्रधानाच्या कामाच्या लेखाजोखा मांडला गेला.व त्यावरून समर्थक व विरोधक यांच्यात वैचारिक मतभेद पाहायला मिळाले.त्यातच पन्हाळा शाहुवाडीचे विध्यामान आमदार डॉ.विनय कोरे प्रचारात सक्रीय झाले. व जनसुराज्य पक्षाचा बाले किल्ला असलेल्या पन्हाळ्यात चुरस वाढत गेली. त्यांनी हि निवडणूक प्रतिष्ठेची बनवली व तश्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या.त्यामुळे पन्हाळा तालुक्यातील गावागावात मतदानाला उस्फुर्त मिळत गेला.

पन्हाळा तालुका हा लोकसभेच्या कोल्हापूर व हातकणगले या दोन मतदार संघात विभागाला आहे.त्यामुळे पन्हाळा तालूक्यातील जनसुराज्य पक्षाच्या भूमिके मुळे फक्त हातकणगलेचा नाही तर कोल्हापूर मतदार संघातहि मतदानात परिणाम दिसणार आहे.त्यामुळे त्याही मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढणार आहे यात शंका नाही.या वाढणाऱ्या टक्केवारीचा फायदा नेमका कोणाच्या पथ्यावर पडणार हे निकालानंतरच समजणार आहे.