कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथे शेतजमिनीच्या मालकीवरुन दोन गटांत हाणामारी झाली. या प्रकरणी सावित्री हाल्लाप्पा पुजारी आणि शोभा मायाप्पा पुजारी (दोघीही रा. घोसरवाड) यांनी परस्परविरोधी तक्रार दिली असून दोन्ही गटातील एकूण ३० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना काल (रविवार) रोजी घडली.

सावित्री पुजारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी मायाप्पा पुजारी आणि इतर १९ जणांनी बेकायदेशीर जमाव करून माझ्या मालकीच्या गट नंबर १०९ मधील शेतजमीनीतील ज्वारी पिकाचे ट्रॅक्टरच्या सहाय्याने नुकसान केले. तसेच शिविगाळ व हाणामारी करत मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

तर शोभा पुजारी यांनी दिलेल्या फिर्यादीत, आरोपी हालाप्पा पुजारीसह इतर दहाजणांनी घरांत घुसून मारहाण करत मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी मायाप्पा सतू पुजारी, सत्याप्पा सिध्दू पुजारी, रावसाहेब शिवराम पुजारी, सुखदेव आण्णापा पुजारी, सागर शिवराम पुजारी, सिद्धा सत्याप्पा पुजारी, तुकाराम बाळू पुजारी, सुरेश सतू पुजारी, सावीत्री आण्णापा पुजारी, रुक्मिणी रावसाहेब पुजारी, रुपाली सागर पुजारी, कल्लवा सतू पुजारी, रुपाली सुखदेव पुजारी, तायव्वा मायाप्पा पुजारी, कावेरी सुरेश पुजारी, छाया तुकाराम पुजारी, छकुली तुकाराम पुजारी, संतोष स़कपाळ (सर्व रा. घोसरवाड), मंगल बिरु बत्ते (रा. रेंदाळ, ता. हातकणंगले), गीता मारुती अकिवाट (रा. हेरवाड)

हालाप्पा लक्ष्मण पुजारी, सावीत्री हालाप्पा पुजारी, ओंकार हालाप्पा पुजारी, आप्पा रामू पुजारी, कल्पना आप्पा पुजारी, महादेव मारुती पुजारी, म्हाळू आप्पा पुजारी, ताराबाई रामू पुजारी, शीला म्हाळू पुजारी, मारुती रामू पुजारी (सर्व रा. घोसरवाड) अशा एकूण ३० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.