मुंबई – सध्या लोकसभा निवडणुकीची धुमाकूळ चालू आहे. सर्व राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. या प्रचारादरम्यान नेते आपली आक्रमक भूमिका मांडताना पाहायला मिळत आहे. वार प्रतीवार करत काही नेते अनेक गोप्यस्फोट देखील करत आहे. अशातच माजी कृषिमंत्री शरद पवारांनी गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. “गेल्या दहा वर्षांत शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. अमित शहांनी आधी हे सांगावं की गेल्या दहा वर्षांत त्यांनी आत्महत्या थांबवण्यासाठी काय काम केलं?” असा सवाल पवारांनी केला. आता यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले चंद्रशेखर चंद्रशेखर बावनकुळे..?

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने “शपथनामा” नावाने लोकसभा निववडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी हल्लाबोल केला. हा शपथनामा जगातील सगळ्यात मोठी फसवणूक म्हटली पाहिजे. खरंच शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का? असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्रात शपथेला प्राणापेक्षा अधिक महत्व आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. आता यावर शरद पवार काय प्रतिउत्तर देतात हे पाहणे महत्वाचं असणार आहे