कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेच्या परिवहन समितीचे नूतन सभापती चंद्रकांत पांडुरंग सुर्यवंशी यांचा केएमटी मुख्य कार्यालयातील सभापती कक्षामधील प्रवेश समारंभ महापौर निलोफर आजरेकर यांच्या उपस्थित आज (बुधवार) झाला.   

या कार्यक्रमास परिवहन समिती सदस्य अशोक जाधव, सतिश लोळगे, यशवंत शिंदे, प्रसाद उगवे, संदीप सरनाईक, माजी महापौर सौ.सरिता मोरे, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, केएमटीचे अधिकारी, कर्मचारी, चंद्रकांत यादव, शिवाजीराव परुळेकर, रमेश मोरे, अशोक पोवार, सदानंद सामंत, अभिजीत सावंत, सर्वपक्षकीय कृती समिती व खंडोबा तालमीचे कार्यकर्ते उपस्थित होते.