कोल्हापूर ( प्रतिनिधी ) आपल्या हिंदू संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला सण म्हणजे गुढीपाडवा. आज गुढीपाडव्याच्या सणानिमित्त उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमधील आपल्या निवासस्थानी सपत्नीक गुढी उभारली. तसेच त्यानंतर करवीर निवासिनी माता अंबाबाईचे दर्शन देखील घेतले.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, कोल्हापूरच्या मातीशी माझे जिव्हाळ्याचे नाते आहे. म्हणूनच, आज हिंदू नववर्ष आणि गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करवीर निवासिनी माता अंबाबाईचे सपत्नीक दर्शन घेतले. हे नववर्ष सर्वांना सुख – समृद्धी भरभराटीसह उत्तम निरोगी आरोग्याचे जावो, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी आईच्या चरणी केली !