कोल्हापूर (प्रतिनिधी) : चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमित भागवत पांडे (वय ३४ सध्या रा. मजरे कार्वे, ता. चंदगड, मूळ रा. खोतवाडी ता. हातकणंगले) यास २० हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

तक्रारदार व त्यांच्या वडिलांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात तपासामध्ये मदत करण्यासाठी ५० हजार लाचेची मागणी करून तडजोडी अंती ४० हजारवरुन पहिला हप्ता २० हजार रुपये देण्याची मागणी उपनिरीक्षक अमित पांडे याने केली होती.

दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार आज सापळा लावून एसीबीने पहिला हप्ता २० हजार स्वीकारताना उपनिरीक्षक अमित पांडे यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस उपधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, अंमलदार पो. ना. सुनील घोसाळकर, नवनाथ कदम, पो. कॉ. संदीप पडवळ, मयूर देसाई, सूरज अपराध यांनी केली.