‘त्या’साठीच संसदेसमोर आंदोलन : राजू शेट्टींचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने मंजूर केलेले तिन्ही कायदे रद्द करण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे देशभरातील शेतकरी २६ व २७ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे संसदेसमोर आंदोलन करणार आहेत. या आंदोलनास देशभरातील असंख्य शेतकरी उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. दिल्लीत आज (मंगळवार) विविध शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.… Continue reading ‘त्या’साठीच संसदेसमोर आंदोलन : राजू शेट्टींचा इशारा

पूर, अतिवृष्टीधारकांसाठी १० हजार कोटींची मदत जाहीर  

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील पूर, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकरी, नागरिकांसाठी राज्य सरकारने आज (शुक्रवार) १० हजार कोटींची मदत जाहीर केली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली. ही मदत खरडून गेलेल्या शेती आणि शेतीच्या नुकसानीसाठी असणार आहे. दिवाळीपर्यंत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ही मदत पोहोच करण्याचे नियोजन सरकारने केले आहे. राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी आज मुख्यमंत्री… Continue reading पूर, अतिवृष्टीधारकांसाठी १० हजार कोटींची मदत जाहीर  

युआयडीआयने आधार कार्डचे बदलले स्वरूप…

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : यूआयडीआयने आता आधार कार्डचे स्वरूप बदलले आहे. नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी पीव्हीसी कार्ड देण्यात येणार आहे. एटीएम प्रमाणे दिसणारे कार्ड मिळणार आहे. हे पन्नास रुपयांत ऑनलाइन मागवता येणार आहे. ऑर्डर केल्यानंतर पाच दिवसांत कार्ड घरपोच मिळणार आहे. यासंबंधी यूआयडीएआयने ट्विटरवर माहिती दिली आहे. नवीन पीव्हीसी आधार कार्डसाठी यूआयडीआयच्या वेबसाइटवर जावे लागेल. त्या ठिकाणी… Continue reading युआयडीआयने आधार कार्डचे बदलले स्वरूप…

‘त्या’मुळेच केंद्र विरुद्ध पंजाब सरकार संघर्ष पेटणार…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मागील महिन्यात केंद्र सरकारद्वारे संमत करण्यात आलेल्या कृषि कायद्यांविरोधात देशभरातील विविध ठिकाणी अद्यापही आंदोलने सुरु आहेत. पंजाब, हरियाणा याचे केंद्रस्थान असतानाच या कायद्याविरोधात पंजाब सरकारने विधानसभेत प्रस्ताव संमत केला आहे. हा प्रस्ताव संमत करणारे पंजाब हे देशातील पहिले राज्य बनले आहे. यामुळे पंजाब सरकार आणि केंद्र सरकारविरुद्ध यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची… Continue reading ‘त्या’मुळेच केंद्र विरुद्ध पंजाब सरकार संघर्ष पेटणार…

राहुल गांधींनी माजी मुख्यमंत्र्यांना फटकारले, ‘असली भाषा चालणार नाही !’

वायनाड (वृत्तसंस्था) : कमलनाथ यांनी वापरलेली भाषा मला अजिबात आवडलेली नाही. असली भाषा चालणार नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना चांगलंच फटकारलं. कमलनाथ यांनी भाजपच्या उमेदवार आणि माजी मंत्री इमरती देवी यांच्याबद्दल ‘आयटम’ शब्द वापरल्यामुळे देशभर वाद निर्माण झाला होता. त्यावरून राहुल गांधी यांनी त्यांना ही समज दिली.… Continue reading राहुल गांधींनी माजी मुख्यमंत्र्यांना फटकारले, ‘असली भाषा चालणार नाही !’

‘त्या’ पत्रामुळे शिवसेना-भाजपाचे संबंध ताणले : अमित शहा

मुंबई (प्रतिनिधी) : मंदिरं, रामलीला, मदरसे यावरून भाजपनं सध्या ठाकरे सरकारविरुद्ध अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचे प्रयत्न भाजपकडून सातत्यानं सुरू आहेत. त्यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून सेक्युलर शब्दावरून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील संबंध ताणले गेले आहेत. या संबंधांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी भाष्य केले.… Continue reading ‘त्या’ पत्रामुळे शिवसेना-भाजपाचे संबंध ताणले : अमित शहा

केंद्र सरकारची डिजिटल मीडियाला मान्यता…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने नुकतेच डिजिटल मीडियाला मान्यता दिली आहे. परिणामी या माध्यमाच्या नियमनाचा मार्गही खुला केला आहे. यामुळे बातम्यांच्या वेबसाईटलाही सरकारी जाहिराती मिळणार आहेत. मुद्रित आणि दृकश्राव्य माध्यमांच्या धर्तीवर डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मलाही बातम्यांमध्ये शिस्त आणि शिरस्ता पाळण्यासाठी स्व- नियमन संस्था स्थापन करण्याची परवानगी दिली आहे. डिजिटल वृत्त माध्यमांत २६ टक्के प्रत्यक्ष परदेशी… Continue reading केंद्र सरकारची डिजिटल मीडियाला मान्यता…

मोदींच्या संपत्तीत वाढ…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकूण संपत्तीमध्ये वाढ झाली आहे. ३० जून रोजी मोदींची एकूण संपत्ती २.८५ कोटी रुपये झाली आहे. २०१९ च्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत यंदा तब्बल ३६ लाखांनी वाढ झाली आहे. त्यांनी कोणतेही कर्ज घेतलेले नाही. त्यांच्या नावावर एकही गाडी किंवा इतर वाहन नाही. ४५ ग्रॅम सोन्याच्या ४ अंगठ्या आहेत.… Continue reading मोदींच्या संपत्तीत वाढ…

कोल्हापुरात उद्या काँग्रेसची भव्य ‘शेतकरी बचाव रॅली’ व्हर्चुअल सभा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शेतकरी विरोधी कायद्यांना विरोध करण्यासाठी उद्या (गुरुवारी) १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यात ६ ठिकाणी भव्य ‘शेतकरी बचाव रॅली’ व्हर्चुअल सभेचे आयोजन केले आहे. या रॅलीमध्ये सहभागी शेतकऱ्यांशी कॉग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी ह्या ऑनलाईन संवाद साधणार आहेत. यातील एक सभा कोल्हापूरात जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये सायंकाळी ४ वा. मर्यादित शेतकऱ्यांच्या उपस्थितीत होणार… Continue reading कोल्हापुरात उद्या काँग्रेसची भव्य ‘शेतकरी बचाव रॅली’ व्हर्चुअल सभा

‘आयफोन’ची बारावी सिरीज आज होणार लाँच

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्मार्टफोन क्षेत्रातली दिग्गज कंपनी अॅपल आज iPhone १२ सिरीज लाँच करण्याची  शक्यता आहे. कंपनी या सिरीजमध्ये एकाचवेळी चार फोन बाजारात आणणार आहे. हा एक ऑनलाईन इव्हेंट असणार असून याची सुरुवात भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजता होणार आहे. हा इव्हेंट अॅपलची वेबसाईट किंवा यूट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे. एका रिपोर्टनुसार कंपनी चार… Continue reading ‘आयफोन’ची बारावी सिरीज आज होणार लाँच

error: Content is protected !!