मोदी सरकारचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (बुधवार) पार पडलेल्या कॅबिनेटच्या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक्स अफेअर्सने साखर कारखान्यांना निर्यातीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी केंद्राने ३५०० कोटी रुपये साखर निर्यात अनुदान देण्यास मंजुरी दिली आहे. सरकारच्या… Continue reading मोदी सरकारचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा…

शेतकरी आंदोलनामुळे तीन राज्यांना दररोज ३५०० कोटींचा फटका : असोचेम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा (मंगळवार) २० वा दिवस आहे. या आंदोलनाचा प्रतिकूल परिणाम तीन राज्यांच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशचे दररोज एकूण ३, ५०० कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचा दावा असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडियाने … Continue reading शेतकरी आंदोलनामुळे तीन राज्यांना दररोज ३५०० कोटींचा फटका : असोचेम

संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली वगळता देशातील अनेक राज्यांत कोरोनाची साथ आटोक्यात असली तरी ती पूर्णपणे संपलेली नाही. दिल्लीत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे यंदाचं संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज (मंगळवार) दिली आहे. जोशी यांनी सांगितले की, देशभरात कोरोनाचा संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी… Continue reading संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द…

कोरोना लस सर्वात आधी ‘जनते’ला की ‘व्हीआईपीं’ना..?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनावर लस शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. २०२१ च्या सुरुवातीपर्यंत एकतरी लस बाजारात येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परंतु इतक्या मोठ्या लोकसंख्येला एकसाथ लस देणे शक्य नाही. या लसीच्या वितरणासाठी नॅशनल व्हॅक्सिन ग्रुप तयार करण्यात आला आहे. कोणत्या गोष्टींच्या आधारे कुणाला लस द्यायची… Continue reading कोरोना लस सर्वात आधी ‘जनते’ला की ‘व्हीआईपीं’ना..?

घुसखोर बांगलादेशींना भारतीय ओळखपत्र मिळवून देणारी टोळी जेरबंद

मुंबई (प्रतिनिधी) : परदेशातून अवैधरीत्या भारतात घुसण्याच्या अनेक घटना आजपर्यंत घडल्या आहेत. बांगलादेशातून दरवर्षी अनेकजण बनावट ओळखपात्रांवर भारतात प्रवेश करतात.घुसखोर बांगलादेशींना भारतीय ओळखपत्र बनवून देणाऱ्या टोळीचा महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकान (एटीएस) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एटीएसने ८ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून विविध सरकारी कार्यालयांचे बनावट रबराचे शिक्के, बनावट पॅन कार्ड, आधार कार्ड जप्त करण्यात आले… Continue reading घुसखोर बांगलादेशींना भारतीय ओळखपत्र मिळवून देणारी टोळी जेरबंद

ग्रँडमास्टर विश्वनाथ आनंद यांच्या जीवनावर बायोपिक…

मुंबई (प्रतिनिधी) :  आजवर अनेक कलाकार, राजकारणी आणि क्रीडा विश्वातील लोकांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट आले आहेत. अशा प्रकारच्या बायोपिकला प्रेक्षकांचीही पसंतीही मिळत आहे. एमएस धोनी, एमसी मेरी कॉम, संदीप सिंग आणि मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.  आता चेस मास्टर विश्वनाथन आनंद यांच्या जीवनावर आधारित सिनेमा लवकरच येणार आहे. विश्वनाथन आनंद  यांनी… Continue reading ग्रँडमास्टर विश्वनाथ आनंद यांच्या जीवनावर बायोपिक…

शेतकऱ्यांसाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा राजीनामा

चंदीगड (वृत्तसंस्था) : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ वर्दी बाजूला ठेवत पंजाब पोलिसमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पंजाबचे डीआयजी (जेल) लखविंदरसिंग जाखर यांनी राज्यातील प्रधान सचिव (गृह) यांना आपला राजीनामा दिला आहे. त्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. जाखर यांनी प्रधान सचिवांना पत्र लिहून सेवेतून अकाली सेवानिवृत्तीची मागणी केली आहे. ते म्हणाले… Continue reading शेतकऱ्यांसाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा राजीनामा

चर्चेच्या फेऱ्या काय करता, आता निर्णय घ्या : राजू शेट्टी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी दिल्लीत पोहोचले आहेत. शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले हे काळे कायदे सरकारने मागे घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली. चर्चेच्या फेऱ्या काय करता, निर्णय घ्या, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ते म्हणाले, ‘शेतकरी ऐन थंडीत… Continue reading चर्चेच्या फेऱ्या काय करता, आता निर्णय घ्या : राजू शेट्टी

स्वत:हून मुली संबंध ठेवतात आणि… ; महिला आयोगाच्या अध्यक्षांचे धक्कादायक विधान

छत्तीसगढ (वृत्तसंस्था) : छत्तीसगढ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक यांनी मुलीबाबत केलेल्या धक्कादायक विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. अनेक मुली या स्वत:हून संबंध ठेवतात आणि ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकरावर बलात्काराचा आरोप करतात, असे संतापजनक विधान नायक यांनी केले आहे. यामुळे त्या वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.    जेव्हा एक विवाहित व्यक्ती एखाद्या तरुणीसोबत… Continue reading स्वत:हून मुली संबंध ठेवतात आणि… ; महिला आयोगाच्या अध्यक्षांचे धक्कादायक विधान

काँग्रेसच्या पराभवाला सोनिया गांधी, मनमोहन सिंग जबाबदार : प्रणव मुखर्जींच्या पुस्तकात टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी २०१४ मधील काँग्रेसच्या दारुण पराभवासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांना जबाबदार धरले आहे. प्रणव मुखर्जी यांचे ‘द प्रेसिडेंशियल इयर्स’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. त्यात काँग्रेस नेतृत्वावर त्यांनी टीकेची झोड उठवली आहे. या पुस्तकात केलेल्या टिप्पणीमुळे वाद होण्याची शक्यता आहे.… Continue reading काँग्रेसच्या पराभवाला सोनिया गांधी, मनमोहन सिंग जबाबदार : प्रणव मुखर्जींच्या पुस्तकात टीका

error: Content is protected !!