मुंबई (प्रतिनिधी) : परदेशातून अवैधरीत्या भारतात घुसण्याच्या अनेक घटना आजपर्यंत घडल्या आहेत. बांगलादेशातून दरवर्षी अनेकजण बनावट ओळखपात्रांवर भारतात प्रवेश करतात.घुसखोर बांगलादेशींना भारतीय ओळखपत्र बनवून देणाऱ्या टोळीचा महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकान (एटीएस) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एटीएसने ८ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून विविध सरकारी कार्यालयांचे बनावट रबराचे शिक्के, बनावट पॅन कार्ड, आधार कार्ड जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अक्रम शेख, मोहम्मद रफीक शेख, अविन केदारे, सोहेल अब्दुल सुभान शेख, अब्दुल खैर समसुलहक शेख, अबुल हाशम ऊर्फ म्हामून काशम शेख, इद्रिस मोहम्मद शेख, नितीन राजाराम निकम या ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे मोहम्मद रफीक, मोहम्मद इद्रीस, अवीन केदारे, नितीन निकम या चार आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने सुमारे ८५ बांगलादेशी घुसखोरांना भारतीय पासपोर्ट मिळवून दिले. तसेच अनेक भारतीयांना देखील बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवून दिले आहेत.