पिंपळगाव खुर्दने ग्रा.पं. निवडणुकीच्या विजयाचे महाद्वार उघडले : मुश्रीफ

कागल (प्रतिनिधी) : पहिल्या टप्प्यात जाहीर झालेल्या ग्रा.पं. पैकी कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्दच्या ग्रामस्थांनी लोकनियुक्त सरपंच म्हणून राष्ट्रवादीला पाठबळ दिले. या माध्यमातून ग्रामपंचायत निवडणुकांच्या विजयाचे महाद्वार उघडले आहे, असे गौरवोद्गार आमदार हसन मुश्रीफ यांनी काढले. पिंपळगाव खुर्द ता. कागल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकनियुक्त सरपंच शीतल नवाळे यांच्यासह उपसरपंच सदाशिव चौगुले व पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात… Continue reading पिंपळगाव खुर्दने ग्रा.पं. निवडणुकीच्या विजयाचे महाद्वार उघडले : मुश्रीफ

सर्व गड-किल्ले अतिक्रमणमुक्त करावेत : नितीन शिंदे

पुणे (प्रतिनिधी) : प्रतापगडाच्या पायथ्याला असणारे अतिक्रमण हटवले, त्याप्रमाणे सरकारने महाराष्ट्रातील अन्य गड-किल्ल्यांवरील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करून अतिक्रमणमुक्त करावे आणि या सर्व गड-किल्ल्यांना पूर्वीचे गतवैभव प्राप्त करुन द्यावे, अशी मागणी माजी आमदार आणि ‘शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलना’चे निमंत्रक नितीन शिंदे यांनी केली. ते हिंदू जनजागृती समिती आयोजित ‘प्रतापगडावरील अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त’ अन्य किल्ल्यांवरील अनधिकृत बांधकामांचे… Continue reading सर्व गड-किल्ले अतिक्रमणमुक्त करावेत : नितीन शिंदे

पाक पंतप्रधानांनी भारतीय संघाची उडवली खिल्ली

लाहोर (वृत्तसंस्था) : टी-२० वर्ल्डकपमध्ये गुरुवारी उपांत्य फेरीमध्ये भारताचा मानहानीकारक पराभव झाला. इंग्लंडकडून भारताचा १० गडी राखून पराभव झाल्यामुळे भारत या विश्वचषक स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे. या मानहानीकारक पराभवाने भारतावर चाहते संतापले असून, सर्वस्तरातून भारतावर टीका सुरू आहे. त्यातच पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनीही ट्विट करत भारताची खिल्ली उडवली आहे. त्यांनी ट्विट करत भारताला… Continue reading पाक पंतप्रधानांनी भारतीय संघाची उडवली खिल्ली

गोकुळच्या दूध उत्पादक महिलांसाठी बायोगॅस योजना : विश्वास पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : एन.डी.डी.बी (मृदा), जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ व सिस्टीमा कंपनी यांच्या संयुक्त सहकार्यातून गोकुळच्या दूध उत्पादक महिलांसाठी कार्बन क्रेडिट योजने अंतर्गत ५००० बायोगॅस प्लान्टची उभारणी करण्यात येणार आहे. कार्बन क्रेडिट बायोगॅस योजनेमध्ये दूध उत्पादक महिलांना, धूर  धूळ विरहीत इंधन घरच्या घरी तयार करता यावे. शेण वाहून नेणे, शेणी लावणे या कामातून महिलांना सुटका… Continue reading गोकुळच्या दूध उत्पादक महिलांसाठी बायोगॅस योजना : विश्वास पाटील

आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. ठाण्यातील विवियाना मॉलमधील ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडला. तसेच, प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांना आज (शुक्रवारी) जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली. आज दुपारी एक  वाजता मला वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ… Continue reading आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक

रेशनवरील गहू वाढवून देण्याची मागणी

पेठवडगाव (प्रतिनिधी) : शासनाने रेशन दुकानातून देण्यात येणाऱ्या गव्हाच्या प्रमाणात कपात केल्यामुळे गोरगरिबांवर अन्याय झाला असून, गव्हाच्या प्रमाणात वाढ करण्याची मागणी होत आहे. रेशन दुकानातून प्राधान्य कुटुंबातील नागरिकांना मोफत धान्य देण्यात येते. यामध्ये प्रति रेशनकार्ड तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ दिला जात होता; परंतु जुलै महिन्यापासून शासनाने गव्हाच्या प्रमाणात कपात केली असून, सध्या… Continue reading रेशनवरील गहू वाढवून देण्याची मागणी

पोलिसांच्या धक्काबुक्कीमुळे माजी मंत्री नितीन राऊत जखमी

हैदराबाद : काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी उर्जामंत्री नितीन राऊत हे मंगळवारी तेलंगणात ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान जखमी झाले. राऊत यांच्या चेहऱ्याला मार लागला आहे. सध्या हैदराबादमधील एका रुग्णालयात राऊत यांच्यावर उपचार सुरु आहेत, अशी माहिती त्यांची मुलगी दीक्षा राऊत यांनी ही माहिती दिली आहे. राऊत म्हणाले की, मी भारत जोडो यात्रेत सहभागी होतो. आम्ही चार… Continue reading पोलिसांच्या धक्काबुक्कीमुळे माजी मंत्री नितीन राऊत जखमी

कोल्हापुरातील अवैध व्यावसायिकांवर कडक कारवाईची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात राजरोसपणे सुरु असलेला मटका, व्हिडीओ गेम यासह इतर अवैध व्यावसायिकांवर कडक कारवाई करावी, अनेक गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्यांचा व्यवसाय ताबडतोब बंद करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. कोल्हापुरातील जुना राजवाडा, करवीर, शाहूपुरी, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी या पोलीस ठाण्यातील निरीक्षकांना, तसेच शहर पोलीस उपाधीक्षक मंगेश… Continue reading कोल्हापुरातील अवैध व्यावसायिकांवर कडक कारवाईची मागणी

नोव्हेंबरपासून महाराष्ट्रासह १० राज्यांमध्ये कडाक्याची थंडी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑक्‍टोबर महिना सरत असताना हवामानातही बदल होणार आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार देशातील १० राज्यांमध्ये थंडी पडणार आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा आणि तेलंगणा सोबतच ६ ते ७ नोव्हेंबर दरम्यान तापमानात झपाट्याने घट होईल. दिवसा आणि रात्रीच्या तापमानात ११ ते १७ अंशांचा फरक दिसून… Continue reading नोव्हेंबरपासून महाराष्ट्रासह १० राज्यांमध्ये कडाक्याची थंडी

हे तर ठाकरे सरकारच्या कोलदांडा प्रवृत्तीचे पाप : खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सुमारे वर्षभरापूर्वीच गुजरात राज्यात गेलेल्या एअरबस प्रकल्पावरून सध्याच्या राज्य सरकारवर टीका करणे म्हणजे महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या जनतेशी केलेले पाप लपविण्याचा प्रकार आहे, अशी टीका भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी केली. ठाकरे सरकारने महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राचे वाटोळे करून आता उलटा कांगावा सुरू केला आहे, असा आरोपही त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या… Continue reading हे तर ठाकरे सरकारच्या कोलदांडा प्रवृत्तीचे पाप : खा. धनंजय महाडिक

error: Content is protected !!