मंगळवेढा तालुक्यात विविध ग्रामपंचायतींवर आ. आवताडे गटाचे वर्चस्व

आवताडेच्या रुपाने भारतीय जनता पार्टीचे मंगळवेढामध्ये निर्विवाद वर्चस्व मंगळवेढा (प्रतिनिधी) : मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांच्या १८ ग्रामपंचायतीमध्ये पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणूकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे पंढरपूर – मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांच्या गटाने तब्बल ९ ग्रामपंचायतींवर एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मंगळवेढा तालुक्यातील एकूण ग्रामपंचायतपैकी रहाटेवाडी व फटेवाडी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अगोदरच बिनविरोध… Continue reading मंगळवेढा तालुक्यात विविध ग्रामपंचायतींवर आ. आवताडे गटाचे वर्चस्व

राज्यात डॉक्टर्स, तंत्रज्ञांच्या साडेचार हजार जागा भरणार

नागपूर (वृत्तसंस्था) : राज्यात लवकरच डॉक्टर्स, तंत्रज्ञांच्या साडेचार हजार जागांवर भरती करण्यात येणार असल्याची घोषणा गिरीश महाजन यांनी केली. ही भरती प्रक्रिया टीसीएसच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. नागपूर येथे सुरु असलेल्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात ही घोषणा करण्यात आली. अधिवेशनात गिरीश महाजन म्हणाले, आम्ही एमपीएसच्या माध्यमातून ३०० डॉक्टर्स  भरले आहेत. सध्या २८ टक्के पदे रिक्त आहेत… Continue reading राज्यात डॉक्टर्स, तंत्रज्ञांच्या साडेचार हजार जागा भरणार

पुढील वर्षासाठीच्या स्थानिक सुट्टया जाहीर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील महाराष्ट्र शासनाच्या सर्व कार्यालयांसाठी सन २०२३ मध्ये जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी तीन दिवस स्थानिक सुट्टया दि. १३ डिसेंबर २०२२ रोजीच्या आदेशान्वये जाहीर केल्या आहेत. या स्थानिक सुट्ट्यांमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती सोमवार दि. २६ जून २०२३, ज्येष्ठा गौरी आवाहन गुरुवार दि. २१ सप्टेंबर २०२३ आणि दिवाळी (अतिरिक्त) सोमवार दि. १३ नोव्हेंबर… Continue reading पुढील वर्षासाठीच्या स्थानिक सुट्टया जाहीर

गगनबावडा : १९ ग्रा.पं. मध्ये सतेज पाटील यांची सत्ता

गगनबावडा (संभाजी सुतार) : गगनबावडा तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीपैकी १९ ग्रामपंचायतीमध्ये आमदार सतेज पाटील यांच्या गटाने सत्ता मिळवली आहे. तालुक्यातील तीन ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध झाल्या, तर १८ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक लागली. यामध्ये ३ सरपंच बिनविरोध तर ३ ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी निवडणूक लागली व १५ ग्रामपंचायतीसाठी सरपंच व सदस्यपदासाठी थेट निवडणूक लागली. यामध्ये तिसंगी येथे जिल्हा परिषद सदस्य भगवान… Continue reading गगनबावडा : १९ ग्रा.पं. मध्ये सतेज पाटील यांची सत्ता

थायलंडच्या जलतरण स्पर्धेत कोल्हापूरकर  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुचे खेळाडू सध्या जगभरात आपला डंका वाजवत आहेत. नुकतीच ओशनमॅन आशियाई चॅम्पियनशिप २०२२ जलतरण स्पर्धा थायलंड येथे पार पडली. यामध्ये जगभरातून २५० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये भारतातील १२  तर महाराष्ट्रातील ६ स्पर्धकांचा समावेश होता. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोल्हापूरच्या दोन खेळाडूंनी पदक आपल्या नावे करत कोल्हापूरचे नाव पुन्हा उंचावले आहे.… Continue reading थायलंडच्या जलतरण स्पर्धेत कोल्हापूरकर  

पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा_डॉ.सय्यद

सांगोला / नाना हालंगडे – नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई म्हशीचे गट वाटप करणे, शेळी – मेंढी गट वाटप करणे, 1000 कुकुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसाह्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25 + 3 तलंगा गट वाटप या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2022 – 23 या वर्षात… Continue reading पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा_डॉ.सय्यद

शिवाजी विद्यापीठात इंदिरा गांधी यांना अभिवादन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठात आज (शनिवारी) भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अहिंसा व एकतेची शपथ घेण्यात आली. प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा… Continue reading शिवाजी विद्यापीठात इंदिरा गांधी यांना अभिवादन

सांबरसदृश प्राण्याच्या मांस वाहतूक प्रकरणी दोघांना अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथे सांबरसदृश प्राण्याचे मांस वाहतूक केल्याप्रकरणी पोलिस व वनविभागाने संयुक्तरीत्या कारवाई करत दोघांना बेड्या ठोकल्या. शुक्रवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून स्नॅपर रायफलही ताब्यात घेण्यात आली आहे. शहा सैफुद्दीन शमशुद्दीन (रा. बेंगळुुरू) व चेतन कुमार सुभाष चंद्र अभिगिरी (रा. गदग) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. तुडीये-कोलिक रोडवर पोलिस निरीक्षक संतोष… Continue reading सांबरसदृश प्राण्याच्या मांस वाहतूक प्रकरणी दोघांना अटक

सौर कृषी वाहिनी योजनेसाठी भाडेतत्वावर जमीन घेणार

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील ज्या ग्रामीण भागांमध्ये गावठाण व कृषी वीज वाहिन्यांचे विलगीकरण झाले आहे. अशा कृषी वीज वाहिन्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याकरिता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे. यासाठी लागणाऱ्या जमिनी प्रति वर्ष ७५ हजार रुपये प्रति हेक्टर या दराने भाडेतत्वावर महावितरणद्वारे घेण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून ३ हजार कृषी वाहिन्यांचे… Continue reading सौर कृषी वाहिनी योजनेसाठी भाडेतत्वावर जमीन घेणार

तृतीयपंथीयांनी ओळखपत्रासाठी अर्ज करावेत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांना ‘राष्ट्रीय तृतीयपंथीय पोर्टल’बाबतची माहिती व्हावी, यासाठी जास्तीत-जास्त पात्र तृतीयपंथीयांनी ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळविण्यासाठी संबंधित वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव तथा समाजकल्याण  विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे. राज्यातील तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने राज्य स्तरावर… Continue reading तृतीयपंथीयांनी ओळखपत्रासाठी अर्ज करावेत

error: Content is protected !!