दख्खनचा राजा श्री जोतिबाची आजची (२४ ऑक्टोबर) आरती पहा ‘लाईव्ह मराठी’वर (व्हिडिओ)

सर्व भाविकांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ! दख्खनचा राजा श्री जोतिबाची आजची (२४ ऑक्टोबर) आरती पहा ‘लाईव्ह मराठी’वर  

‘शिक्षण सहसंचालक’मधील दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित करा ! : आ. प्रकाश आबिटकर (व्हिडिओ)

उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातील मनमानी कारभारावर टीका करून दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी आ. प्रकाश आबिटकर यांनी केली.  

नवरात्रोत्सवाचा चौथा दिवस : श्री अंबाबाईची महापूजा – ओमकाररूपिणी स्वरूपात…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज (मंगळवार) नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची महापूजा ओमकाररुपिणी स्वरुपात बांधण्यात आली. चतुर्थीला श्री अंबाबाई सहस्त्र नामस्रोत उद्धृत होणार आहे. या सहस्त्रनामाची पार्श्वभूमी अशी – मार्कंडेय ऋषी आणि नारद मुनी यांच्या संवादातून सनतकुमारांनी सांगितलेल्या महालक्ष्मी सहस्त्रनामाचे विवेचन केले आहे.  सनतकुमार योगीजनांना महालक्ष्मीची हजार नावे सांगतात. ही पूजा मकरंद मुनीश्वर आणि माधव… Continue reading नवरात्रोत्सवाचा चौथा दिवस : श्री अंबाबाईची महापूजा – ओमकाररूपिणी स्वरूपात…

आप्पाचीवाडी फाट्याजवळील अपघातात कोगनोळीचे युवक जखमी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्गावर (क्रमांक ४)  असणाऱ्या आप्पाचीवाडी फाट्याजवळ कार व मोटरसायकल अपघातात कोगनोळी येथील दोन युवक जखमी झाले. ही घटना आज (मंगळवार)  सकाळी घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, निपाणी येथील शिक्षक आशिष नांगावकर हे नॅनो कार ( केए २४ एम ३३०२) घेऊन कागलला निघाले होते. येथील आप्पाचीवाडी फाट्याजवळ आले असता… Continue reading आप्पाचीवाडी फाट्याजवळील अपघातात कोगनोळीचे युवक जखमी

‘सिबिल गेलं खड्ड्यात,  शेतकऱ्यांना कर्ज कधी देता बोला..!

बीड (प्रतिनिधी) : खा. संभाजीराजे छत्रपती बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्याची क्षेत्राची पाहणी करीत आहेत. यादरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरुन थेट बॅंक अधिकाऱ्यांना सुनावले. सिबील वगैरे गेले खड्ड्यात, ते काय करायचे आपण ठरवा, आधी शेतकऱ्यांना कर्ज कधी ते बोला, अशा शब्दांत त्यांनी कुंभारवाडीतील ग्रामस्थांना कर्ज देण्यावरून टोलवाटोलवी करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना मोबाईलवरून झापले. खा. संभाजीराजे बँक अधिकाऱ्यास… Continue reading ‘सिबिल गेलं खड्ड्यात,  शेतकऱ्यांना कर्ज कधी देता बोला..!

घरगुती गॅस सिलिंडरबाबत महत्त्वाची बातमी..!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घरगुती गॅस सिलिंडरच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता तेल कंपन्या घरपोच डिलिव्हरीसाठी १ नोव्हेंबरपासून तेल कंपन्या डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (DAC) ही यंत्रणा वापरणार आहेत. योग्य ग्राहकालाच सिलिंडर मिळावा आणि सिलिंडरच्या चोरीवर गदा यावी म्हणून ही यंत्रणा लागू केली जात असल्याचं वृत्त आहे. डीएसी यंत्रणेअंतर्गत, ग्राहकांनी गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर त्याच्या नोंदणीकृत… Continue reading घरगुती गॅस सिलिंडरबाबत महत्त्वाची बातमी..!

चंदगड नगरपंचायतीला ‘त्या’बाबतचे सर्व अधिकार मिळावेत : पालकमंत्र्यांकडे मागणी

चंदगड (प्रतिनिधी) : रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना (घरकुल योजना) तसेच बांधकाम कामगार नोंदणी करण्याबाबतचे सर्व अधिकार लवकरात लवकर चंदगड नगरपंचायतीला मिळावे अशी मागणी नगरपंचायतीचे बांधकाम सभापती अभिजित गुरबे यांनी पालकमंत्री ना. सतेज पाटील यांच्याकडे केली. पालकमंत्री पाटील यांनी काल (रविवार) चंदगड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांसोबत कोवाड येथे आढावा घेतला. या… Continue reading चंदगड नगरपंचायतीला ‘त्या’बाबतचे सर्व अधिकार मिळावेत : पालकमंत्र्यांकडे मागणी

नव्या आयुक्तांचा कारवाईचा दणका

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेच्या नवे आयुक्त डॉ. कांदबरी बलकवडे सक्रिय प्रशासकीय कामकाजात सक्रिय झाल्या आहेत. त्यांनी रविवारी विनामास्क फिरणाऱ्या ३५ जणांवर कारवाईचे आदेश दिले. त्यांच्या या कारवाईच्या दणक्याने प्रशासकीय यंत्रणाही हलली आहे. रंकाळा चौपाटी परिसरात स्वच्छता मोहिमेच्या काळात कोरोना प्रतिबंधक उपायोजनावरही भर देण्यात आले. सकाळी विनामास्क फिरणाऱ्या ३५ जणांवर महापालिकेच्यावतीने दंडात्मक कारवाई करुन ३ हजार… Continue reading नव्या आयुक्तांचा कारवाईचा दणका

किल्लारी भूकंपावेळी खचला नाहीत, आता या संकटानं खचू नका : शरद पवार

मुंबई (प्रतिनिधी) : किल्लारी भूकंपावेळी खचला नाहीत. तेव्हा आता या संकटानं खचून जाऊ नका असं  आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शेतकऱ्यांना केल. राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळ सर्वाधिक फटका हा बळीराजाला बसला आहे. ऐन कापणीला आलेली पिक उध्वस्त झाल्यामुळं जगावं ती मरावं असाच प्रश्न या पोशिंद्यापुढ उभा राहिला आहे. याच पार्श्वभूमीवर पवार आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर… Continue reading किल्लारी भूकंपावेळी खचला नाहीत, आता या संकटानं खचू नका : शरद पवार

प्रसंगी कर्ज काढू, पण बळीराजाला जगवू..! : नामदार मुश्रीफ

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : आधीच कोरोनाने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत मदत करण्याची महाविकास आघाडीची भूमिका आहे. त्यासाठी प्रसंगी कर्ज काढू पण बळीराजाला जगवू अशी ग्वाही राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज येथे दिली. ते पंचायत समितीत झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते. अजूनही… Continue reading प्रसंगी कर्ज काढू, पण बळीराजाला जगवू..! : नामदार मुश्रीफ

error: Content is protected !!