इतर महत्त्वाची शासकीय कार्यालयेही कागलला नेणार का ?

करवीर (राहुल मगदूम) : नुसते ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र नाही तर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेची सर्व प्रशासकीय कार्यालय आणि सीपीआर हॉस्पिटलही कागल तालुक्यात हलवणार, असा संतप्त सवाल कोल्हापूरवासियांतून होत आहे. याला कारण म्हणजे कसबा बावडा येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र २२ किमीवर असलेल्या कागल तालुक्यातील सांगाव रोडवरील नवोदय विद्यालय येथे हलविण्याचा घाट घातला जात आहे. ही इमारत… Continue reading इतर महत्त्वाची शासकीय कार्यालयेही कागलला नेणार का ?

मटका घेणाऱ्यास अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : टिंबर मार्केट परिसरात एक इसम कल्याण मटका घेत असल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मटका घेणाऱ्या राजाराम बापू पोवार (वय ६६, रा. टिंबर मार्केट, कोल्हापूर) याला अटक केली असून त्याच्याकडून रोख रक्कम व मटक्याचे साहित्य असा सुमारे दोन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी… Continue reading मटका घेणाऱ्यास अटक

चंगू-मंगूच्या फालतू गप्पांमध्ये रस नाही… : निलेश राणे

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली असून ती मुलाखत शुक्रवारी प्रसिद्ध होणार आहे. संजय राऊत यांनी ट्विटरवर मुलाखतीचा प्रोमो शेअर केला आहे. या वेळी संजय राऊत यांनी उद्या धमाका होणार असल्याचं पोस्टमध्ये म्हटलं आहे. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी… Continue reading चंगू-मंगूच्या फालतू गप्पांमध्ये रस नाही… : निलेश राणे

‘पुण्यात आम्ही पंतप्रधान मोदींचा मार्ग अडवणार…’

नवी मुंबई (प्रतिनिधी) : पुणे दौऱ्यावर येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मार्ग मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने अडवण्याचा इशारा देण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबतच्या मागणीची दखल घेत नसल्याने आम्हाला हे पाऊल उचलणे भाग असल्याचे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी २८ नोव्हेंबरला पुण्यात येणार आहेत.… Continue reading ‘पुण्यात आम्ही पंतप्रधान मोदींचा मार्ग अडवणार…’

शिंगणापुरातील जुगार अड्ड्यावर छापा : १२ जणांना अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथील एका मळ्यात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बारा जणांना अटक केली. जुगार खेळणाऱ्यांकडून पोलिसांनी रोख ९२ हजार, पाच दुचाकी आणि १३ मोबाईल असे ३ लाख २५ हजारांचे साहित्य जप्त केले.  करवीर तालुक्यातील सिद्ध बटुकेश्वर मंदिरामागील पोर्लेकर मळ्यात प्रकाश निंबाळकर, सुरेश तिवले आणि… Continue reading शिंगणापुरातील जुगार अड्ड्यावर छापा : १२ जणांना अटक

कर्तव्य बजावताना कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख : ना हसन मुश्रीफ

मुंबई (प्रतिनिधी) : कर्तव्य बजावताना कोरोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झालेल्या ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीच्या विविध पदावरील १७ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची विमा रक्कम अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आज (शुक्रवार) निर्गमित करण्यात आला असून संबंधीत कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत,… Continue reading कर्तव्य बजावताना कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख : ना हसन मुश्रीफ

अंगणवाडी, आरोग्य सेविकांचे कार्य समाजाभिमुख : राजेंद्र सूर्यवंशी

सावरवाडी (प्रतिनिधी) : कोरोना काळात सामान्य जनतेला दिलासा देऊन शासनाच्या नियमांंचे पालन करून अंगणवाडी, आरोग्यसेविकांचे केलेले कार्य हे समाजाभिमुख आहे, असे प्रतिपादन करवीर पंचायत समितीचे माजी सभापती व उद्योगपती राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले. कसबा बीड (ता. करवीर) येथे कोरोनाकाळात प्रामाणिक काम केल्याबद्दल गावातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका, मदतनीस यांना सूर्यवंशी यांच्याहस्ते साडी भेट देऊन कृतज्ञता व्यक्त… Continue reading अंगणवाडी, आरोग्य सेविकांचे कार्य समाजाभिमुख : राजेंद्र सूर्यवंशी

कोल्हापूरहून निघालेल्या ‘त्या’ बसला अपघात

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सायन पनवेल महामार्गवर कोल्हापूरवरून बदलापूरच्या दिशेने निघालेल्या एका खासगी बसला आज (बुधवार)  पहाटे साडे पाचच्या सुमारास भीषण अपघात झाला. यामध्ये बसमधील १६ प्रवाशी जखमी आहेत. जखमीवर कामोठे येथील एका रूग्णालयात उपचार सुरू आहेत. एम एच ०८ ई ९२८७ या क्रमांकाची बस पहाटे कामोठे येथील पुरुषोत्तम पेट्रोल पंपा जवळील भुयारी मार्गावर आदळली. चालकाचा… Continue reading कोल्हापूरहून निघालेल्या ‘त्या’ बसला अपघात

…आता अर्जुन रामपाल देखील एनसीबीच्या रडारवर

मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात समोर आलेल्या ड्रग कनेक्‍शनमध्ये बॉलिवूडमधील अनेक नावे समोर आता येत आहेत. नारकोटिक्‍स कंट्रोल ब्यूरोकडून याप्रकरण कसून चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता अर्जुन रामपाल आज (शुक्रवार) सकाळी १० वाजता चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाला आहे. याबाबत एनसीबीकडून अर्जुनला समन्स बजावण्यात आला आहे.काही दिवसांपूर्वी एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी… Continue reading …आता अर्जुन रामपाल देखील एनसीबीच्या रडारवर

हिरवडे खालसा येथील धनाजी पाटील यांचे आमरण उपोषण मागे 

म्हालसवडे (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील हिरवडे खालसा येथे ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते धनाजी पाटील यांनी मागील सात दिवसांपासून ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण केले होते. त्यांनी आज (मंगळवार) आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. जिल्हा प्रशासनाकडून दोषींवर कारवाई करण्याचे पत्र मिळाल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात धनाजी पाटील यांनी गेले सात दिवस आमरण उपोषण केले. शौचालय… Continue reading हिरवडे खालसा येथील धनाजी पाटील यांचे आमरण उपोषण मागे 

error: Content is protected !!