टोप (प्रतिनिधी) : कराड येथील गीता व्यसन मुक्ती संस्थेच्या प्रमुख आणि सिने अभिनेत्री गीता पाठक यांना सोनाई इंटरप्राइजेसच्या वतीने हिरकणी पुरस्कार संजय जाधव, आनंदराव साळुंखे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

समाजातील विविध क्षेत्रामध्ये सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीना प्रोत्साहन देण्यासाठी संजय जाधव हे गेली अनेक वर्षे काम करत आहेत. गीता व्यसन मुक्ती संस्थेच्या प्रमुख गीता पाठक यांनी व्यसनमुक्त चळवळ समाजात रुजवून अनेकाना व्यसनापासून कायमचे दूर केले आहे.या कार्याची दखल घेऊन हिरकणी पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.

यावेळी नंदू कुडची, उमेश कुडची, विद्या कुडची, पार्वती कुडची, पुरुषोत्तम पाठक,पुष्पा पाठक, तुकाराम बुआ, ब्रम्हानंद शिंदे, विजय साठे आदी उपस्थित होते.