राशिवडे (प्रतिनिधी) : इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळातून मिळणाऱ्या योजना समजण्यासाठी लाल बावटातर्फे जनजागृती मोहीम सुरु केली असून, या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कॉ. संदीप सुतार यांनी केले आहे.

ते म्हणाले, लाल बावटा बांधकाम कामगार संघटना सक्रिय असून, या संघटनेच्या माध्यमातून गावोगावी कामाच्या ठिकाणी जाऊन बांधकाम कामगारांना नवीन नोंदणी, नूतनीकरण, शैक्षणिक शिष्यवृत्ती, घरकुल सुरक्षा संच किट, शैक्षणिक शिष्यवृत्ती व इतर अनेक  योजनेचा लाभ देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. त्यासाठी संघटनेच्या वतीने जनजागृत मोहीम आयोजित करण्यात आली आहे. संघटनेच्या आवळी बुद्रुक ऑफिसमध्ये स्मार्ट कार्ड व पावती वाटप करण्यात येत आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाल बावटा संघटनेशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.