मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी धनगर समाजाचे नेते आण्णासाहेब डांगेंची घेतली भेट..!

सांगली ( प्रतिनिधी ) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाचे नेते माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन येऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने धैर्यशील माने यांच्याबाबत बंद खोलीत चर्चा केली. यावेळी आण्णासाहेब डांगे म्हणाले . धनगर समाजाचे अनेक प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत . त्यांची… Continue reading मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी धनगर समाजाचे नेते आण्णासाहेब डांगेंची घेतली भेट..!

भाजपाला देशातून तडीपार करा : आदित्य ठाकरे

हातकणंगले (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या स्वाभिमान आणि मराठी अस्मितेवर आक्रमण करून लूट करणाऱ्या मोदी-शहांच्या भाजपाला देशातून तडीपार करून इतिहास घडवा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. ते वडगाव येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलत होते. आदित्य ठाकरे म्हणाले की, माने त्यांची राजकीय कारकीर्द संपली… Continue reading भाजपाला देशातून तडीपार करा : आदित्य ठाकरे

धैर्यशील माने यांच्या विजयासाठी रात्रीचा दिवस करावा : खा. अनिल बोंडे

इचलकरंजी (प्रतिनिधी) : महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी अखेरच्या टप्प्यात सर्वच समर्थक कार्यकर्त्यांनी थेट मतदाराशी संपर्क साधून त्यांना मतदानासाठी आग्रह धरावा. धैर्यशील माने यांच्या विजयांसाठी रात्रीचा दिवस करून मताधिक्य देण्याचे आवाहन खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी धैर्यशील माने यांच्या प्रचाराच्या निमित्ताने माजी कृषीमंत्री, राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे, आमदार वसंत खंडेलवाल यांनी… Continue reading धैर्यशील माने यांच्या विजयासाठी रात्रीचा दिवस करावा : खा. अनिल बोंडे

महाराणी ताराराणी, राजर्षी शाहू महाराज यांना राजे राजवर्धन कदमबांडे यांनी केले अभिवादन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी शाहू महाराज यांचे थेट वारसदार आणि पणतू राजे राजवर्धन कदमबांडे मी आज त्यांच्या पूर्वजांच्या पुतळ्यांना अभिवादन करून पुष्पांजली अर्पण केले. युतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी ते कोल्हापूरमध्ये आले होते. राजे कदमबांडे यांनी करवीर संस्थांच्या संस्थापिका महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून… Continue reading महाराणी ताराराणी, राजर्षी शाहू महाराज यांना राजे राजवर्धन कदमबांडे यांनी केले अभिवादन…

विकास कामांच्या आडवे याल तर याद राखा ; राजेश क्षीरसागर यांचा ‘कुणाला’ इशारा..?

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : सगळ काय मीच केले म्हणवून घेण्याची सवय कॉंग्रेस नेत्याला लागली आहे. त्यांचा मी पणा इतका वाढला आहे कि भर सभेत ते मतदारांना बघून घेण्याची भाषा करत आहेत. महायुती उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांना वाढता प्रतिसाद पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून, ते आगामी ध्येयधोरणे सोडून व्यक्तिगत टीकेवर भर देवून मतदारांची दिशाभूल करत… Continue reading विकास कामांच्या आडवे याल तर याद राखा ; राजेश क्षीरसागर यांचा ‘कुणाला’ इशारा..?

पराभव दिसू लागल्याने मोदींना महाराष्ट्र आठवला : नाना पटोले

भाजप व RSS चा पहिल्यापासूनच आरक्षणाला विरोध सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा व पुण्यातील प्रचारसभेतून तेच तेच काँग्रेस विरोधी रडगाणे गायिले. मोदी यांना प्रचारासाठी सातत्याने महाराष्ट्रात यावे लागते हे भाजपाचा दारूण पराभव होत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. महाराष्ट्रातील मोठे उद्योग, गुंतवणूक व रोजगार गुजरातला पळवून नेले त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना… Continue reading पराभव दिसू लागल्याने मोदींना महाराष्ट्र आठवला : नाना पटोले

‘ही’ लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध चेहरा नसलेल्या आघाडीशी : सुनिल तटकरे

पेण : ही लढाई केवळ सुनिल तटकरे विरुद्ध अनंत गीते एवढी सिमीत नाही ही लढाई महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आहे. ही लढाई एनडीए विरुद्ध इंडिया आघाडीमध्ये आहे. ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध नसलेला चेहरा अशा आघाडीशी आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी पेण येथील महायुतीच्या… Continue reading ‘ही’ लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध चेहरा नसलेल्या आघाडीशी : सुनिल तटकरे

कारखाना वाचवण्यासाठी मी कुठेही जायला तयार ; अभिजीत पाटलांचे वक्तव

सोलापूर : शरद पवार गटाचे नेते अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल सहकारी कारखान्यावर कारवाई केल्यानंतर अभिजीत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतील असे वक्तव्य शरद पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते. यानंतर आज अभिजीत पाटील यांनी सोलापूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर अभिजीत पाटील यांनी कारखाना वाचत असेल तर मी… Continue reading कारखाना वाचवण्यासाठी मी कुठेही जायला तयार ; अभिजीत पाटलांचे वक्तव

पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मनसेचा निर्धार मेळावा संपन्न

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ रविवारी मनसेच्या निर्धार मेळाव्याचे आयोजन पुणे (प्रतिनिधी ) : पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर आण्णा मोहोळ यांच्या प्रचारार्थ रविवारी पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा निर्धार मेळावा संपन्न झाला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती होती. चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, माननीय राजसाहेब… Continue reading पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मनसेचा निर्धार मेळावा संपन्न

महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करा ; चंद्रकांत पाटील यांचं पुणेकरांना आवाहन

पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचे आयोजन पुणे (प्रतिनिधी ) : पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ रविवारी पुण्यातील कोकणवासियांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी चंद्रकांत पाटील, आमदार भरतशेठ गोगावले आणि उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले कि, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात… Continue reading महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करा ; चंद्रकांत पाटील यांचं पुणेकरांना आवाहन

error: Content is protected !!