विरोधी उमेदवारांनी आता तरी अजिंक्यतारावरून येणारी स्क्रिप्ट तरी बदलावी : संजय मंडलिक

बानगेसह म्हाकवे, मळगे बुद्रुक, बिद्री येथील सभांना उस्फूर्त प्रतिसाद बानगे, (प्रतिनिधी ) – विरोधकांनी आता तरी अजिंक्यतारा वरून येणारी स्क्रिप्ट तरी बदलावी. रोज तेच तेच मुद्दे वाचून दाखवून त्यांनाही कंटाळा आला असावा. असा टोला महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी लगावला. कागल तालुक्यातील बाणगेसह म्हाकवे, मळगे बुद्रुक, बिद्री येथे आयोजित जाहीर प्रचार सभांमध्ये प्रा. मंडलिक बोलत… Continue reading विरोधी उमेदवारांनी आता तरी अजिंक्यतारावरून येणारी स्क्रिप्ट तरी बदलावी : संजय मंडलिक

दत्तक विधान झालेल्या वाड्याचाही बाजार केल्याचा जमादार यांचा गंभीर आरोप..!

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : आजवर मुंबई ,बेंगलोर ,कोल्हापूरसह कोट्यावधी रुपयांच्या मालमत्ता विकल्या गेल्या आहेत, गादीचे वारसदार असल्याचे सांगणाऱ्यांनी अगदी दत्तक विधान झालेल्या वाड्याची मालमत्ताही विकून खाल्ल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांनी केला आहे. लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते मुरगूड येथे बोलत होते. राजे राजवर्धन कदमबांडे यांनी पत्रकार परिषद… Continue reading दत्तक विधान झालेल्या वाड्याचाही बाजार केल्याचा जमादार यांचा गंभीर आरोप..!

धैर्यशील मानेंना मत म्हणजे देशाला दिशा देणारे मत : श्रीकांत शिंदे

इचलकरंजी : मतदारसंघात विकास कामासाठी अधिकाधिक निधी खेचून आणणे व देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या विषयावर संसदेत आवाज उठवण्याची जबाबदारी धैर्यशील माने यांनी चोखपणे पार पाडली आहे. आपले मत धैर्यशील मानेंना म्हणजेच नरेंद्र मोदीला असेल. देशाला योग्य दिशेने घेऊन जाणारा नेता हे नरेंद्र मोदीच आहेत. त्यामुळे देशाला दिशा देणारे आपले मत असणार आहे,असा विश्वास खासदार डॉ.… Continue reading धैर्यशील मानेंना मत म्हणजे देशाला दिशा देणारे मत : श्रीकांत शिंदे

गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालयात रक्तदान शिबीर संपन्न

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध संघ कर्मचारी संघटना,आयटक कामगार केंद्र व करवीर कामगार संघ , यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने १ मे २०२४ कामगार दिनाचे औचित्य साधून वैभवलक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर यांच्या मार्फत रक्तदान शिबिर गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे आयोजित केले होते. या शिबीरामध्ये ३२५ कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन गोकुळचे चेअरमन अरुण… Continue reading गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालयात रक्तदान शिबीर संपन्न

सदाशिवराव मंडलिकांचे पांग फेडण्याची हीच योग्य वेळ : हसन मुश्रीफ

बाचणी : लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांनी संपूर्ण आयुष्य गोरगरीब जनतेसाठी खर्ची घातले. त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. आपण त्यांचे देणे लागतो, ही भावना मनी ठेवा. प्रा. संजय मंडलिक यांना विजयी करून त्यांचा पांग फेडण्याची हीच योग्य वेळ आहे, असे भावनिक उद्गार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. बाचणी ता. कागल येथे महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक… Continue reading सदाशिवराव मंडलिकांचे पांग फेडण्याची हीच योग्य वेळ : हसन मुश्रीफ

भारतीय संविधान चंद्र -सूर्य असेपर्यत बदलणे शक्य नाही : संजय मंडलिक

म्हाकवे : भारतीय संविधानामुळे सर्वंच नागरिकांना एकसमान पातळीवर आणून ठेवले आहे. विरोधक माञ नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास भारतीय संविधान बदलले जाईल, असा कांगावा करत आहेत. भारतीय संविधान चंद्र-सूर्य असेपर्यत कोणीही बदलू शकत नाही, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी केले. विरोधकांकडे सांगण्यासारखे कामच नसल्यामुळे ते नुसते आरोप करत सुटले असल्याचेही मंडलिक यांनी… Continue reading भारतीय संविधान चंद्र -सूर्य असेपर्यत बदलणे शक्य नाही : संजय मंडलिक

पराभव दिसू लागल्यानेच विकासाचे मुद्दे सोडून विरोधकांकडून खालच्या स्तराचे राजकारण सुरु : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर( प्रतिनिधी ) : मंगळवार पेठ आणि मंगळवार पेठेतील नागरिक हिंदुत्वाला मानणारे आहेत. मंगळवार पेठेने सर्वच निवडणुकांमध्ये आपले बहुमोल मत शिवसेनेच्या पारड्यात टाकले आहे. मंगळवार पेठेचा सर्वांगीण विकास ही शिवसेनेची जबाबदारी असून, येथील मुलभूत सोई सुविधांसह तालीम संस्थांच्या बांधकामाला निधी देवून शिवसेनेने विकास कार्याचे पर्व अखंडीत सुरु ठेवले आहे. सत्ता असो वा नसो समाजकार्याच्या माध्यमातून… Continue reading पराभव दिसू लागल्यानेच विकासाचे मुद्दे सोडून विरोधकांकडून खालच्या स्तराचे राजकारण सुरु : राजेश क्षीरसागर

आदमापूर देवस्थानचा अंतिम निकाल : जूने सर्व विश्वस्थ कायम

कपिलेश्वर (प्रतिनिधी) : आदमापूर (ता. भुदरगड) येथील बाळूमामा देवालय ट्रस्टच्या जुन्या विश्वस्थांना कायम केल्याचा मा. धर्मादाय आयुक्त कोल्हापूर यांनी निर्णय दिला आहे. देशभरातल्या अखंड सद्गगुरू बाळूमामा भक्तांना मोठा दिलासा दिला असल्याचा़ी प्रतिक्रिया अनेक भक्तांनी दिली. गेले दिड ते दोन वर्ष चाललेल्या या लढ्याला अखेर योग्य तो न्याय मिळाल्याची भावना भक्तांनी व्यक्त केली आहे. सद्गगुरू बाळूमामा… Continue reading आदमापूर देवस्थानचा अंतिम निकाल : जूने सर्व विश्वस्थ कायम

खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी करणसिंह गायकवाड यांचा झंजावाती दौरा..!

शाहूवाडी ( प्रतिनिधी ) – आजवरच्या एकाही खासदाराने शाहूवाडी तालुक्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते मात्र खा. धैर्यशील माने खासदार झाल्यापासून या भागाकडे जातीनिशी लक्ष घालून या भागातील रस्ते ,पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यां बरोबरच औदयोगिक वसाहत उभी करून बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचे काम केले आहे . त्यांच्या प्रयत्नांमुळेच दुर्गम भागाच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली आहे… Continue reading खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी करणसिंह गायकवाड यांचा झंजावाती दौरा..!

भाजपाला देशातून तडीपार करा : आदित्य ठाकरे

हातकणंगले (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या स्वाभिमान आणि मराठी अस्मितेवर आक्रमण करून लूट करणाऱ्या मोदी-शहांच्या भाजपाला देशातून तडीपार करून इतिहास घडवा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. ते वडगाव येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलत होते. आदित्य ठाकरे म्हणाले की, माने त्यांची राजकीय कारकीर्द संपली… Continue reading भाजपाला देशातून तडीपार करा : आदित्य ठाकरे

error: Content is protected !!