देश घडवणारा अभियंता व्हा : डॉ.विनयरावजी कोरे

वारणानगर (प्रतिनिधी ) : तुमची व आई वडिलांची स्वप्ने घेऊन तूम्ही वारणेत आला, उत्कृष्ट अभियंते म्हणुन स्वतः ला सिध्द केले, आपल्या विषयात प्राविण्य मिळवले पण देश घडवणारा अभियंता बनण्याचा प्रयत्न करा असा सल्ला श्री वारणा विविध उद्योग शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे यांनी दिला. निमित्त होते तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनॉमस)… Continue reading देश घडवणारा अभियंता व्हा : डॉ.विनयरावजी कोरे

महापालिका आयुक्त  के. मंजूलक्ष्मींनी दिली रंकाळा सुशोभीकरण कार्यस्थळी भेट

कोल्हापूर : रंकाळा तलाव इथं सुरु असलेल्या या कामाची बुधवारी दुपारी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी अचानक कार्यस्थळी  जाऊन तपासणी केली. यावेळी त्यांना या ठिकाणी ठेकेदारामार्फत पुर्ण क्षमतेने कामे सुरु नसल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर कामावर ठेकेदाराचे कोणीही कामगार उपस्थित नव्हते. याठिकाणी कोणतीही यंत्रसामुग्री उपलब्ध नव्हती. त्यामुळे प्रशासकांनी नाराजी व्यक्त करुन ही कामे दिलेल्या मुदतीत पुर्ण करण्याच्या सूचना… Continue reading महापालिका आयुक्त  के. मंजूलक्ष्मींनी दिली रंकाळा सुशोभीकरण कार्यस्थळी भेट

भारतीय फुटबॉल संघाचा स्टार खेळाडू सुनिल छेत्रीची निवृत्ती…

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय फुटबॉल संघाचा स्टार खेळाडू आणि कर्णधार सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. कुवेतविरुद्धच्या फिफा विश्वचषक पात्रता फेरीनंतर तो आंतरराष्ट्रीय फुटबॉलला कायमचा निरोप देणार आहे. सुनील छेत्रीने आज १६ मे रोजी कुवेत विरुद्ध फिफा विश्वचषक २०२६ च्या पात्रता फेरीनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली. सुनील छेत्रीच्या निवृत्तीमुळे भारतीय… Continue reading भारतीय फुटबॉल संघाचा स्टार खेळाडू सुनिल छेत्रीची निवृत्ती…

‘या’साठी मान्सूनपूर्व कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करा : जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी मान्सून पूर्व कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठकीत दिल्या. मान्सून पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हास्तरावरील सर्व संबंधित विभागप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मान्सून काळात पडणारा पाऊस, संभाव्य पूरस्थिती, अचानक पडणाऱ्या वीजा आणि इतर आपत्तींचे व्यवस्थापन… Continue reading ‘या’साठी मान्सूनपूर्व कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करा : जिल्हाधिकारी

निकालाआधीच पुण्यात मविआ उमेदवारांच्या विजयाचे झळकले बॅनर

पुणे : महाराष्ट्र चार टप्प्यात मतदान पार पडले आहे. अजून पाचव्या टप्प्यातील मतदान बाकी आहे. त्या आधी 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर कोल्हापूर हातकणंगले लोकसभा मतदार संघात महाविकस आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील आणि महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या कार्यकर्त्यांनी खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचे बॅनर लागले होते. यानंतर आता चौथ्या टप्प्यात मतदान… Continue reading निकालाआधीच पुण्यात मविआ उमेदवारांच्या विजयाचे झळकले बॅनर

डी वाय पाटील फार्मसी मध्ये ‘जी पॅट’ परीक्षेबाबत मार्गदर्शन

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) – डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये प्रथम व द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांसाठी ‘जी पॅट’ एक्झामबाबत मार्गदर्शनपर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. प्राचार्य डॉ. सी एम जंगमे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यशाळेत ‘जी पॅट’ प्रशिक्षक आणि करिअर मार्गदर्शक, फार्मस्टार अकेडमी नांदेडचे संचालक डॉ विजयकुमार चकोते यांनी यावेळी परीक्षेतील यशाचे मंत्र विद्यार्थ्यांना… Continue reading डी वाय पाटील फार्मसी मध्ये ‘जी पॅट’ परीक्षेबाबत मार्गदर्शन

वादळी वाऱ्यावेळी होर्डिंगखाली कोणीही न थांबण्याच्या महापालिकेच्या सूचना  

कोल्हापूर : ‘वादळी वाऱ्याच्या वेळी होर्डिंगखाली कोणीही थांबू नये’ असे फलक होर्डिंगच्या खाली लावण्याच्या सूचना कोल्हापूर महापालिकेच्या उपायुक्त साधना पाटील यांनी दिल्या आहेत. घाटकोपर इथल्या एका पेट्रोल पंपावर जाहिरात होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झालाय. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं तातडीनं शहरातील होर्डिंग व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली. यावेळी या बैठकीत होर्डिंग… Continue reading वादळी वाऱ्यावेळी होर्डिंगखाली कोणीही न थांबण्याच्या महापालिकेच्या सूचना  

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं अभिवादन

पुणे ( प्रतिनिधी ) रणधुरंधर योद्धे, स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती बुधवारी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विश्व हिंदू मराठा संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला. सर्वप्रथम चंद्रकांत पाटील यांनी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या कोथरूडमधील निवासस्थानी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून… Continue reading धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं अभिवादन

कर्नल वैभव काळे यांना वीरमरण आल्याचे वृत्त वेदनादायी : मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे (प्रतिनिधी) : इस्रायल-हमास संघर्षात सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात संरक्षण समन्वय अधिकारी म्हणून कार्यरत असणारे वैभव अनिल काळे यांचा मृत्यू झाला आहे. वैभव काळे यांना वीरमरण आल्याचे वृत्त अतिशय वेदनादायी असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ना. चंद्रकांत पाटील यांनी, वैभव काळे यांनी भारतीय लष्करात अनेक मोहिमांमध्ये… Continue reading कर्नल वैभव काळे यांना वीरमरण आल्याचे वृत्त वेदनादायी : मंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर जिल्ह्यातून हज यात्रेसाठी जाणाऱ्या 319 भाविकांचे लसीकरण..

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातून हज यात्रेसाठी जाणार्‍या 319 भाविकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच भाविकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी सुविधा अ‍ॅपची निर्मिती केली आहे, अशी माहिती राज्य हज कमिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इम्तियाज काझी यांनी दिली. मुस्लिम धर्मियामध्ये हज यात्रेला विशेष महत्त्व असून ही यात्रा पवित्र असल्याची भाविकांमध्ये धारणा आहे. हजमध्ये गेल्यानंतर भाविकांना कोणत्याही अडचणी… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यातून हज यात्रेसाठी जाणाऱ्या 319 भाविकांचे लसीकरण..

error: Content is protected !!