आजअखेर ७८ हजारांवर कुटूंबांचे जणांचे सर्वेक्षण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’या मोहिमेअंतर्गत कुटुंब कल्याण केंद्राच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणात आतापर्यंत ७८ हजार ३२३ घरांचे आणि ३ लाख ४१ हजार १६९ लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली. सर्वेक्षण झालेल्या कुटुंबांची संख्या तालुकानिहाय अशी : आजरा २८३१, भुदरगड २०३३,… Continue reading आजअखेर ७८ हजारांवर कुटूंबांचे जणांचे सर्वेक्षण

कंबरेच्या वेदनेपासून आता मुक्त व्हा;  डॉ. सटाले यांचा चुंबकीय पट्टा गुणकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्याच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आपण अनेक आजारांना आमंत्रण देत असतो. वाढत्या वयामुळे कंबरेच्या मणक्यामध्ये हाडांची झीज होते. स्नायूंचा आकुंचनपणा, मार लागणे, दबणे, बसण्या-उठण्याच्या चुकीच्या पद्धती, आहारातील बदल, यामुळे मणक्याचे विकार वाढतच आहेत. मणक्याच्या विकारातून कायमचे मुक्त होण्यासाठी गेल्या २५ वर्षांच्या संशोधनातून डॉ. सटाले केंद्राने चुंबकीय पट्टा तयार केला आहे. या पट्ट्याच्या नियमित वापराने… Continue reading कंबरेच्या वेदनेपासून आता मुक्त व्हा;  डॉ. सटाले यांचा चुंबकीय पट्टा गुणकारी

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ७१४ कोरोनाबाधित : १७ जणांचा मृत्यू    

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (बुधवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात ७१४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात १०३८ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १००९ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ७१४ कोरोनाबाधित : १७ जणांचा मृत्यू    

ब्रेकिंग न्यूज : रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन

बेळगाव (प्रतिनिधी) : रेल्वे राज्यमंत्री आणि बेळगावचे खासदार सुरेश अंगडी (वय ६५) यांचे कोरोनामुळे आज (बुधवार) निधन झाले. त्यांच्यावर दिल्लीतल्या एम्समध्ये रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अंगडी यांना ११ सप्टेंबरला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. त्यांनी स्वत: ट्विट करून त्याची माहिती दिली होती. सुरेश अंगडी हे बेळगावमधील सदाशिव नगरमध्ये ते राहत… Continue reading ब्रेकिंग न्यूज : रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन

बोरपाडळे आरोग्यवर्धिनी परिक्षेत्रातील १७ पथकांमार्फत ४० टक्के सर्वेक्षण

बोरपाडळे (प्रतिनिधी) : बोरपाडळे आरोग्यवर्धिनी अंतर्गत कार्यरत कोरोना सर्वेक्षण १७ पथकाचे काम समाधानकारक असून सुमारे ४० टक्के सर्वेक्षण झाले आहे. पथकांनी स्वतःची काळजी घेत काळजीपूर्वक तपासणी करत सर्वेक्षण माहिती मोबाईल अॅपवर भरण्याचे आवाहन पन्हाळा तहसीलदार रमेश शेडगे यांनी केले. ते बोरपाडळे येथील जय मल्हार सभाग्रहामध्ये १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान होत असलेल्या विशेष कोरोना… Continue reading बोरपाडळे आरोग्यवर्धिनी परिक्षेत्रातील १७ पथकांमार्फत ४० टक्के सर्वेक्षण

तामगावच्या वेदांत कंपनीकडून कोविड सुरक्षा साहित्य आयुक्तांकडे सुपूर्द

कोल्हापूर (प्रतिनिधी) : तामगांव येथील वेदांत टूल्स प्रा. लिमिटेडच्यावतीने सामाजिक बांधिलकी म्हणून ६ हजार एन-९५ मास्क, ४ हजार ८०० हातमोजे आणि १०० पीपीई किट असे कोविड-१९ सुरक्षा साहित्य आज (बुधवार) महापालिका आयुक्त डॉ. मलिलनाथ कलशेट्टी यांच्याकडे सुपूर्द केले. तामगांव येथील वेदांत टूल्स प्रा.लिमिटेडचे मॅनेजिक डायरेक्टर दत्तात्रय देसाई यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्यावतीने कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेसाठी सामाजिक… Continue reading तामगावच्या वेदांत कंपनीकडून कोविड सुरक्षा साहित्य आयुक्तांकडे सुपूर्द

लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्वाचा : तहसिलदार शीतल मुळे-भामरे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सरकारच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम करवीर तालुक्यात प्रभावीपणे राबवण्यात येईल. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकप्रतिनिधींनी या मोहिमेत पुढाकार घ्यावा. लोकप्रतिनिधी आपल्या गावात मोहिमेची प्रचार, प्रसिद्धी करुन गावकऱ्यांचे प्रबोधन करावे, असे आवाहन तहसिलदार शीतल मुळे-भामरे यांनी केले. यावेळी त्यांनीउजळाईवाडी येथे भेट देऊन आरोग्य पथकामार्फत सुरु असलेल्या तपासणीत सहभाग घेतला. तहसिलदार म्हणाल्या की,… Continue reading लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्वाचा : तहसिलदार शीतल मुळे-भामरे

विश्ववती आयुर्वेदिकच्या औषधांना शासनाची मान्यता

कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय आणि रिर्सच सेंटरशी संलग्न संस्था आहे. चिकित्सालयातर्फे कोरोना महामारीच्या सुरवातीच्या काळात माधव रसायन आणि रस माधव वटीच्या निर्मिती प्रक्रियेस सुरवात केली. सद्गुरू आनंदनाथ महाराजांच्या संकल्पनेतून आणि वैद्य समीर जमदग्नी यांच्या मार्गदर्शनातून श्री विश्ववती आयुर्वेद चिकित्सालय व संशोधन केंद्र, कोल्हापुरात ही वटीच्या निर्मितीची… Continue reading विश्ववती आयुर्वेदिकच्या औषधांना शासनाची मान्यता

‘एकटी’ संस्थेच्या बेघर महिलांनी बनविलेले मास्क पोलिसांना भेट

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या काळामध्ये पोलिसांचे खूप मोलाचे योगदान आहे. त्यामुळे ‘एकटी’ संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या बेघर निवाऱ्यामार्फत पोलिसांना मास्क देण्यात आले. पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून मास्क आणि आभाराचे पत्र पोलिसांना देण्यात आले आहेत. यात जुना राजवाडा, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी या पोलीस स्टेशनना एकटी संस्थेतर्फे मास्क देण्यात आले. महानगरपालिका आणि एकटी संस्था यांच्या संयुक्त… Continue reading ‘एकटी’ संस्थेच्या बेघर महिलांनी बनविलेले मास्क पोलिसांना भेट

विना मास्क ५२ जणांना दंड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कुरुंदवाड नगरपरिषदेने विना मास्क फिरणाऱ्या ५२ जणांकडून ८ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. आजअखेर विना मास्क फिरणाऱ्या १७७६ व्यक्तींकडून १ लाख ५१ हजार ६०० रुपये दंडाची वसुली करण्यात आली आहे. जयसिंगपूर नगरपरिषदेने विना मास्क फिरणाऱ्या १२ जणांकडून २ हजार ३७० रुपयांचा दंड वसूल केला आहे. आजअखेर १३१६ व्यक्तींकडून १ लाख… Continue reading विना मास्क ५२ जणांना दंड

error: Content is protected !!