चंद्रकांतदादांनी घेतले सारथीतंर्गत मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या हिताचे महत्वपूर्ण निर्णय…

मुंबई (प्रतिनिधी) :  छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या अंतर्गत वसतीगृह, शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील याच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सारथी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या आढावा… Continue reading चंद्रकांतदादांनी घेतले सारथीतंर्गत मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या हिताचे महत्वपूर्ण निर्णय…

रांगोळीच्या पवन कुरणेची आसाम रायफल्समध्ये निवड

रांगोळी (प्रतिनिधी) : येथील पवन प्रभाकर कुरणे याची आसाम रायफल्समध्ये कॉन्सटेबल पदासाठी निवड करण्यात झाली आहे. तो इचलकरंजी येथील राजाराम स्टेडियमवर सराव करत होता. शेतकरी कुटुंबातील पवनला पहिल्यापासून आर्मीमध्ये जाण्याची इच्छा होती. यासाठी त्याचे वडील प्रभाकर कुरणे यांनी पवनला इचलकरंजी येथे रनिंग व लेखी क्लाससाठी पाठविले. १२ वी.नंतर आदर्श करिअर अकॅडमी येथे ६ महिने सराव… Continue reading रांगोळीच्या पवन कुरणेची आसाम रायफल्समध्ये निवड

अग्निवीरवायू पदासाठी २३ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावेत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतीय वायुसेनेच्या अग्निपथ योजनेअंतर्गत ‘अग्निवीरवायू’ पदाकरिता १७½  ते २१ वर्षाच्या आतील नोकरी इच्छुक अविवाहित मुले, मुलींकरिता पदभरती होणार आहे. इच्छुक मुला-मुलींनी https://agnipathvayu.cdac.in या संकेतस्थळावर दि. २३ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे. अर्ज… Continue reading अग्निवीरवायू पदासाठी २३ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावेत

सामायिक प्रवेश परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी अर्ज करावेत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर सामायिक प्रवेश परीक्षा-२०२३ च्या यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या प्रशिक्षणासाठी दि. २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन भारतीय प्रशासकीय सेवापूर्व केंद्राच्या संचालक डॉ. लता जाधव यांनी केले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षा सन २०२३ करिता पूर्ववेळ प्रशिक्षणासाठी राज्यातील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई व भारतीय प्रशासकीय… Continue reading सामायिक प्रवेश परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी अर्ज करावेत

शिष्यवृत्ती पात्रता यादीत कोल्हापूर राज्यात अव्वल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने जुलैमध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या पात्रता यादीत कोल्हापूरने (२८ टक्के) अव्वल स्थान पटकावले. या यशाबद्दल जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी विद्यार्थ्यांसह प्रशासन अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती… Continue reading शिष्यवृत्ती पात्रता यादीत कोल्हापूर राज्यात अव्वल

डॉ. अभिनंदन पाटील यांना ‘इंडिया एक्सलन्स अवॉर्ड’

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे सहयोगी प्रा. डॉ. अभिनंदन पाटील यांना ‘इंडिया एक्सलन्स अवॉर्ड-२०२२’ ने सन्मानित करण्यात आले. बेंगळुरू येथील हॉटेल ताज येथे झालेल्या कार्यक्रमात अभिनेत्री अम्रीता रॉय हिच्या हस्ते त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. संशोधन, चित्रपट, प्रसारमाध्यमे आणि ब्रँडिंग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा ‘ब्लाईंडविक’ या संस्थेकडून इंडिया एक्सलन्स अवॉर्डने सन्मान केला… Continue reading डॉ. अभिनंदन पाटील यांना ‘इंडिया एक्सलन्स अवॉर्ड’

शिक्षणशास्त्रच्या विद्यार्थ्यांनी दुहेरी पदवीचा लाभ घ्यावा : डॉ. कृष्णा पाटील 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिक्षणशास्त्र विषयातून बी.एड., एम.एड. करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दुहेरी पदवीचा लाभ घ्यावा, असे आवाहन दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. कृष्णा पाटील यांनी केले. विटा येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ एज्युकेशन व शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने ऑनलाईन दुहेरी पदवी मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आंतरविद्याशाखा अधिष्ठाता… Continue reading शिक्षणशास्त्रच्या विद्यार्थ्यांनी दुहेरी पदवीचा लाभ घ्यावा : डॉ. कृष्णा पाटील 

शिवाजी विद्यापीठात स्तुति कार्यक्रमाचा समारोप  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग प्रायोजित अत्याधुनिक विश्लेषणात्मक उपकरण प्रशिक्षण कार्यशाळा शिवाजी विद्यापीठातील सैफ डीएसटी-सीएफसी विभागात दि. १ ते ७ नोव्हेंबर दरम्यान झाली. स्टार्ट अप इंडिया आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा अंतर्गत देशातील वेगवेगळ्या नामांकित संस्थेतून आलेल्या संशोधकांना या विभागामधील अत्याधुनिक उपकरणांची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके देण्यात आली. देशातील नामवंत प्राध्यापक, वैज्ञानिक यांचे मार्गदर्शन मिळाले.… Continue reading शिवाजी विद्यापीठात स्तुति कार्यक्रमाचा समारोप  

पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये रणजित निकम प्रथम

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे पदार्थ विज्ञान विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘पोस्टर प्रेझेंटेशन’ स्पर्धेत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या रणजित पांडुरंग निकम याने प्रथम स्थान पटकावले आहे. पुणे विद्यापाठाच्या भौतिकशास्त्र विभागात पदार्थ विज्ञानावरील ‘अॅडव्हान्स मटेरियल सिंथेसीस कॅरेक्टरायझेशन अँड अॅप्लिकेशन’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत २५० हून अधिक विद्यार्थ्यांनी… Continue reading पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये रणजित निकम प्रथम

विद्यार्थ्यांना आता पुस्तकांसोबत वह्याही मिळणार फ्री

मुंबई (प्रतिनिधी) : शालेय विद्यार्थ्यांना दप्तराचे ओझे खूप होते ही समस्या अनेक वर्षांपासून मांडली जात आहे. विद्यार्थ्यांच्या पुस्तकांचे ओझे कसे कमी करता येईल याबाबत सतत सरकार आणि काही सामाजिक संस्था विचार करत असतात; मात्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना पुस्तकांमध्येच एक कोरे पान लावून देण्यासह विद्यार्थ्यांना पुस्तकांसह वह्याही मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय… Continue reading विद्यार्थ्यांना आता पुस्तकांसोबत वह्याही मिळणार फ्री

error: Content is protected !!