विद्यार्थ्यांना आता पुस्तकांसोबत वह्याही मिळणार फ्री

मुंबई (प्रतिनिधी) : शालेय विद्यार्थ्यांना दप्तराचे ओझे खूप होते ही समस्या अनेक वर्षांपासून मांडली जात आहे. विद्यार्थ्यांच्या पुस्तकांचे ओझे कसे कमी करता येईल याबाबत सतत सरकार आणि काही सामाजिक संस्था विचार करत असतात; मात्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना पुस्तकांमध्येच एक कोरे पान लावून देण्यासह विद्यार्थ्यांना पुस्तकांसह वह्याही मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय… Continue reading विद्यार्थ्यांना आता पुस्तकांसोबत वह्याही मिळणार फ्री

पोलिस भरतीवरील स्थगिती उठवली

मुंबई (प्रतिनिधी) :  अनेक वर्षांपासून रखडलेली पोलिस दलातील शिपाई पदाची भरती आता मार्गी लागली आहे. या भरती प्रक्रियेदरम्यान सर्व उमेदवारांना ९ ते ३० नोव्हेंबर दरम्यान पोलीस दलाच्या  Policerecruitment2022.mahait.org  आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर माहिती मिळणार आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. या भरती प्रक्रियेत पहिल्यांदा शारीरिक क्षमता चाचणी आणि नंतर १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली… Continue reading पोलिस भरतीवरील स्थगिती उठवली

डी. वाय. पाटील अभियांत्रिमध्ये ऑरडिनो प्रोजेक्टवर कार्यशाळा संपन्न…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी नवीन तंत्रज्ञानाचे धडे देणारी ‘ऑरडिनो प्रोजेक्ट’ वर आधारित कार्यशाळा घेण्यात आली. सध्याच्या युगात विकसित होत असलेली नवनवीन तंत्रप्रणाली विक विद्यार्थ्यापर्यंत पोहचविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यशाळेत ऑरडिनोचा वापर करून नवनवीन प्रोजेक्टस कसे बनवता येतात,  त्यासाठी लागणारे कोडिंग याचे प्रात्यक्षीक दाखवण्यात… Continue reading डी. वाय. पाटील अभियांत्रिमध्ये ऑरडिनो प्रोजेक्टवर कार्यशाळा संपन्न…

गट-क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा सुरळीतपणे पार पडली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा-२०२२ आज (शनिवारी) सकाळी ११ ते १२ या एका सत्रात जिल्हा केंद्रावर, कोल्हापूर शहरातील एकूण २९ उपकेंद्रावर घेण्यात आली. ही पूर्वपरीक्षा सुरळीतपणे पार पडली. परीक्षेकरिता कोल्हापूर जिल्हा केंद्रावर एकूण ९ हजार ७६८ उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली. परीक्षेच्या कामकाजाकरिता उपकेंद्रावर एकूण १ हजार ८७ अधिकारी,… Continue reading गट-क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा सुरळीतपणे पार पडली

कळे विद्यामंदिरमध्ये मामासाहेब गुळवणी यांना अभिवादन

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे संस्थापक स. आ. तथा मामासाहेब गुळवणी यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त कळे विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज या प्रशालेत त्यांना अभिवादन करण्यात आले. प्रशालेचे पर्यवेक्षक ए. बी. गायकवाड यांच्या हस्ते मामासाहेबांच्या पुतळ्यास हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. ज्येष्ठ सहायक शिक्षक पी. एल. हावळ यांनी मामासाहेब गुळवणी यांच्या कार्याचा… Continue reading कळे विद्यामंदिरमध्ये मामासाहेब गुळवणी यांना अभिवादन

विकसित तंत्रे जणू मानवाची ज्ञानेन्द्रिये : प्रा. चक्रवर्ती

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्याप्रमाणे मानवी ज्ञानेन्द्रिय समोरच्या गोष्टींचे विश्लेषण करीत असतात त्याचप्रमाणे ही तंत्रे कोणतीही वस्तू खराब न करता त्यामधील असलेल्या कमतरतेचा शोध लावतात. आज कालच्या युगात अशा प्रकारच्या तंत्रांचे फार महत्त्व आहे अनेक औद्योगिक क्षेत्रे देखील अशा तंत्रांचा वापर करताना दिसतात, असे प्रतिपादन फरीदाबाद येथील मानव रचना इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड स्टडीजचे प्रा. एस.… Continue reading विकसित तंत्रे जणू मानवाची ज्ञानेन्द्रिये : प्रा. चक्रवर्ती

शैक्षणिक धोरण अंमलबजावणीबाबत समितीचा अहवाल केंद्राकडे सादर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या संदर्भात दिल्ली येथे उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धमेंद्र प्रधान यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या शैक्षणिक धोरणाचे महाराष्ट्रात अंमलबजावणीच्या अनुषंगाने राज्य शासनाने ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक जलद कार्यदलाच्या (टास्क फोर्स) शिफारशीच्या आधारावर… Continue reading शैक्षणिक धोरण अंमलबजावणीबाबत समितीचा अहवाल केंद्राकडे सादर

कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. शिर्के

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठाच्या (क्लस्टर युनिव्हर्सिटी) कुलगुरूपदी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांची निवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार समूह विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. समूह विद्यापीठ स्थापन करण्याबाबत राज्य सरकारने मे २०२१ मध्ये निर्णय घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या… Continue reading कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. शिर्के

‘डी. वाय. पाटील’च्या २१ विद्यार्थ्यांची ‘केपीआयटी’मध्ये निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा येथे अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या २१ विद्यार्थ्यांची ‘केपीआयटी टेक्नॉलॉजी पुणे’  या कंपनीमध्ये निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना ४.५० ते ६ लाखापर्यंतचे सॅलरी पॅकेज मिळाले आहे. २०२२-२३ या वर्षत ३५८ हून अधिक मुलांची प्लेसमेंट झाली असून, ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे. ‘केपीआयटी टेक्नॉलॉजी पुणे’ ही कंपनी… Continue reading ‘डी. वाय. पाटील’च्या २१ विद्यार्थ्यांची ‘केपीआयटी’मध्ये निवड

तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयात प्रज्ञा भोसले अव्वल…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कृषी व कृषीसंलग्न पदवी अभ्यासक्रमासाठी सुरु असलेल्या प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीमध्ये एमएच-सीईटी परीक्षेमध्ये तब्बल ९९.५५ टक्के गुण प्रज्ञा भोसलेने मिळवले. याबाबत तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालचे प्राचार्य डी. एन. शेलार यांच्या हस्ते आज (रविवार) यांच्या हस्ते सत्कार करण्यातच आला. महाराष्ट्र कृषी संशोधन परिषद, पुणे यांच्याकडून प्रथम वर्ष कृषी आणि… Continue reading तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयात प्रज्ञा भोसले अव्वल…

error: Content is protected !!