कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने जुलैमध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या पात्रता यादीत कोल्हापूरने (२८ टक्के) अव्वल स्थान पटकावले.

या यशाबद्दल जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी विद्यार्थ्यांसह प्रशासन अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत २१ हजार ५९३ विद्यार्थ्यांपैकी ८ हजार ९९१ विद्यार्थी, तर आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत १२ हजार १२० विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ४३४ विद्यार्थ्यांनी पात्रता यादीत नाव मिळवून यश संपादन केले आहे.