अर्थचिंतेच्या धसक्याने ‘सेन्सेक्स’ घसरला

मुंबई : जागतिक बाजारातील नरमाई आणि मध्यवर्ती बँकांच्या आक्रमक दरवाढीतून बळावलेल्या आर्थिक मंदीच्या शक्यतेने धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी गुरुवारी केलेल्या विक्रीच्या ताणाने निर्देशांकांनी पुन्हा एकदा मोठी घसरण नोंदविली. मुंबई निर्देशांक ‘सेन्सेक्स’ एके प्रसंगी तर मंगळवारच्या तुलनेत १,००० अंश खाली गडगडला होता. पुढे तो काहीसा सावरला तरी ७७०.४८ अंश अर्थात १.२९ टक्क्यांच्या घसरणीसह ५८,७६६.५९ वर स्थिरावला. त्याचप्रमाणे, व्यापक… Continue reading अर्थचिंतेच्या धसक्याने ‘सेन्सेक्स’ घसरला

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात

नवी दिल्ली : गगनाला भिडणाऱ्या गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १०० रुपायांनी कपात करण्यात आली आहे. मात्र, ही कपात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात करण्यात आली आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर दरात या महिन्यातही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीत इंडेनच्या १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडर दरात ९१.५० रुपयांची घट झाली. कोलकात्यात १००, तर मुंबईत ९२.५० रुपयांनी कपात… Continue reading व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात

केडीसीसीमध्ये लाभार्थ्यास कर्ज मंजूर पत्राचे वितरण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केडीसीसी बँकेमध्ये इतर मागासवर्ग महामंडळ योजनेचे कर्ज मंजुरीपत्र लाभार्थ्याला देण्यात आले. कागल येथील सागर शिवाजीराव गुरव यांना दूध व्यवसायासाठी पाच लाखांचे बिनव्याजी कर्जाचे मंजुरीपत्र देण्यात आले. केडीसीसी बँकेच्या वतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना रोजगार, उद्योग-व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य सुरू आहे. बँकेने आतापर्यंत एक हजारांवर बेरोजगार युवकांना … Continue reading केडीसीसीमध्ये लाभार्थ्यास कर्ज मंजूर पत्राचे वितरण

‘महाराष्ट्र-अमेरिकेदरम्यान गुंतवणुकीच्या विविध संधी खुल्या होतील’

मुंबई : भारताची अर्थव्यवस्था मजबूत असल्याने जगभरातील देश भारतात येऊ इच्छितात. ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ ने अमेरिकेत व्यापार परिषदेचे आयोजन करून महाराष्ट्राला ज्या पध्दतीने सादर केले आहे, ते पाहता महाराष्ट्र व अमेरिकेदरम्यान गुंतवणुकीच्या नवीन संधी खुल्या होतील, असा विश्‍वास भारताचे न्यूयॉर्कमधील कॉन्सुलेट जनरल रणधीर जायस्वाल यांनी व्यक्त केला. ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर’… Continue reading ‘महाराष्ट्र-अमेरिकेदरम्यान गुंतवणुकीच्या विविध संधी खुल्या होतील’

‘गोकुळ’तर्फे गाय दूध खरेदी दरात १ रुपयाची वाढ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाशी संलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाय दूध खरेदी दरामध्‍ये दि. २१ ऑगस्टपासून संघाने सरासरी प्रतिलिटर १ रुपये वाढ केलेली आहे. दि. २५ ऑगस्टच्‍या संचालक मंडळाच्‍या बैठकीमध्‍ये हा निर्णय घेण्‍यात आला आहे, अशी माहिती संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांनी दिली. गाय दूध खरेदी दर ३.५ फॅट व… Continue reading ‘गोकुळ’तर्फे गाय दूध खरेदी दरात १ रुपयाची वाढ

Jio-Airtel-Vi १३ शहरांत लाँच करणार 5G सर्व्हिस

नवी दिल्ली : Jio-Airtel-Vi ५ जी सर्व्हिसवरून गेल्या काही दिवसांपासून अनेक बातम्या समोर येत आहेत. आता भारतात ५ जी रोलआऊट पुढील महिन्यात केली जाणार आहे. दूरसंचार विभागने हे आधीच स्पष्ट केले आहे. पहिल्या टप्प्यात या सर्व्हिसला देशातील १३ शहरांत लाँच केले जाणार आहे. आता कोणत्या शहरात ५ जी सर्व्हिसला पहिल्या टप्प्यात आणले जाणार आहे. ५… Continue reading Jio-Airtel-Vi १३ शहरांत लाँच करणार 5G सर्व्हिस

स्पिनिंग मिल्सच्या अध्यक्षपदी आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची फेरनिवड

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : देशभरातील सहकारी सूतगिरण्या व वस्त्रोद्योग क्षेत्रातील सहकारी तत्त्वावरील अनेक संस्थांचे नेतृत्व करणाऱ्या ऑल इंडिया फेडरेशन ऑफ को-ऑप. स्पिनिंग मिल्स, मुंबई या संस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची बिनविरोध निवड झाली. या संस्थेवर अनेक वर्षे सहकारमहर्षी स्व. शामराव पाटील-यड्रावकर… Continue reading स्पिनिंग मिल्सच्या अध्यक्षपदी आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची फेरनिवड

अनिल अंबानी यांना ४२० कोटींच्या करचोरी प्रकरणी नोटीस

मुंबई : आयकर विभागाने अनिल अंबानी यांना त्यांच्या अघोषित ४२० कोटींच्या करचोरी प्रकरणी आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. त्यामुळे रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आधीच आर्थिक दिवाळखोरीची टांगती तलवार लटकत असताना आता काळा पैसा कायद्यांतर्गत अनिल अंबानींवर कारवाई होण्याची शक्यता आहे. अनिल अंबानी यांनी जाणीपूर्वक करचोरी केली असल्याचा आरोप… Continue reading अनिल अंबानी यांना ४२० कोटींच्या करचोरी प्रकरणी नोटीस

विविध सणांमुळे सप्टेंबमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार

मुंबई : सप्टेंबर महिन्यामध्ये गणेशोत्सवासोबत अनेक सण आहेत. या सणांच्या काळामध्ये बँका बंद राहणार आहेत. सप्टेंबर महिन्यात बँकेशी संबंधित काही काम करायची असतील तर ग्राहकाला बँका कोणत्या दिवशी बंद असणार आहेत हे जाणून घेणे खूपच गरजेचे आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने सप्टेंबर २०२२ मधील बँकेच्या सुट्यांची यादी जाहीर केली आहे. आरबीआयने आपल्या अधिकृत वेबसाईटवर सुट्यांची यादी… Continue reading विविध सणांमुळे सप्टेंबमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार

शेअर बाजारात घसरण; गुंतवणूकदारांच्या ६.५ लाख कोटींचा चुराडा

मुंबई : आजचा दिवस शेअर बाजारासाठी ‘ब्लॅक मंडे’ ठरला. सेन्सेक आज शेअर बाजारात ८७२ अंकांनी घसरला, तर निफ्टीही २६८ अंकांनी घसरला. सलग दोन सत्रांत शेअर बाजारात घसरण झाल्याने त्याचा फटका गुंतवणूकदारांना बसला. सलग दोन सत्रातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या ६.५ लाख कोटी रुपयांचा चुराडा झाला. अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेड त्याच्या व्याजदरात आणखी वाढ करण्याची शक्यता आहे. त्याचा… Continue reading शेअर बाजारात घसरण; गुंतवणूकदारांच्या ६.५ लाख कोटींचा चुराडा

error: Content is protected !!