मुंबई : सप्टेंबर महिन्यामध्ये गणेशोत्सवासोबत अनेक सण आहेत. या सणांच्या काळामध्ये बँका बंद राहणार आहेत. सप्टेंबर महिन्यात बँकेशी संबंधित काही काम करायची असतील तर ग्राहकाला बँका कोणत्या दिवशी बंद असणार आहेत हे जाणून घेणे खूपच गरजेचे आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने सप्टेंबर २०२२ मधील बँकेच्या सुट्यांची यादी जाहीर केली आहे. आरबीआयने आपल्या अधिकृत वेबसाईटवर सुट्यांची यादी जारी केली आहे. सप्टेंबरमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार आहेत.

आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या सुट्यांच्या यादीनुसार, सप्टेंबर महिन्यात देशाच्या विविध भागांत विविध सण साजरे केले जातात. यामध्ये गणेशोत्सव, नवरात्री या सारख्या सणांचा समावेश आहे. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि रविवारी या साप्ताहिक सुट्ट्या असतील. सप्टेंबर महिन्यात १३ दिवस बँकांमध्ये कामकाज होणार नाही. या कालावधीत ग्राहक एटीएम, इंटरनेट बँकिंग, नेट बँकिंग आणि इतर सेवांचा वापर करण्याचे आवाहन भारतीय रिझर्व्ह बँकेने केले आहे.

सप्टेंबरमधील बँक सुट्ट्यांची यादी

१ सप्टेंबर- गणेश चतुर्थी (दुसरा दिवस)- पणजीत बँका बंद, ४ सप्टेंबर- रविवार (साप्ताहिक सुट्टी)
६ सप्टेंबर- कर्मपूजा- रांचीमध्ये बँका बंद, ७ सप्टेंबर- पहिला ओणम- कोची आणि तिरुवनंतपूरममध्ये बँका बंद
८ सप्टेंबर- थिरुओनम- कोची आणि तिरुअनंतपूरममध्ये बँका बंद,  ९ सप्टेंबर : इंद्रजात्रा-गंगटोकमध्ये बँक बंद
१० सप्टेंबर- शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार), श्री नरवणे गुरु जयंती, ११ सप्टेंबर- रविवार (साप्ताहिक सुट्टी)
१८ सप्टेंबर- रविवार (साप्ताहिक सुट्टी), २१ सप्टेंबर- श्री नरवणे गुरु समाधी दिन- कोची, तिरुवनंतपूरममध्ये बँका बंद
२४ सप्टेंबर- शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार), २५ सप्टेंबर- रविवार (साप्ताहिक सुट्टी)
२६ सप्टेंबर- नवरात्री स्थापना / लॅनिंगथौ सन्माही चौरेन हौबा- इम्फाळ आणि जयपूरमध्ये बँका बंद.