करवीर पोलिसांनी केली सराईत मोटारसायकल चोरट्यास अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर पोलिसांनी आज (गुरुवार) सराईत मोटारसायकल चोरट्यास शिताफीने अटक केली. मारुती गुंडू मस्कर (वय ५४, रा. सध्या उचगाव, ता. करवीर, मूळ गाव – मोरेवाडी ता. चंदगड जि कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. करवीर तालुक्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी… Continue reading करवीर पोलिसांनी केली सराईत मोटारसायकल चोरट्यास अटक

इचलकरंजी येथे गुटखा वाहतूक करणाऱ्यास अटक…

इचलकरंजी (प्रतिनिधी) : मोटारीतून तंबाखूजन्य पदार्थ आणि गुटखा वाहतूक करणार्‍या एकाला इचलकरंजीतील गावभाग पोलिसांनी अटक केली. इजाजअली अशरफअली कित्तुर (वय २४, रा. विक्रमनगर, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा, चारचाकी गाडी आणि मोबाईल असा सुमारे २ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. इचलकरंजीतील हॉटेल ताराजवळ गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती… Continue reading इचलकरंजी येथे गुटखा वाहतूक करणाऱ्यास अटक…

कोल्हापूर आरटीओमध्ये १.२३ कोटींचा गैरव्यवहार : डॉ. स्टीव्हन अल्वारीस

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) मागील ५ वर्षांपासून ६१३ वाहनांचे मूल्य अल्प दाखवून संगनमताने १ कोटी २३ लाख ३७ हजार रुपयांचा कर शासनाच्या तिजोरीत जमा न करता परस्पर हडप करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असून त्याचा अहवाल आठवड्याभरात राज्याच्या परिवहन आयुक्तांना देण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी… Continue reading कोल्हापूर आरटीओमध्ये १.२३ कोटींचा गैरव्यवहार : डॉ. स्टीव्हन अल्वारीस

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याची एनसीबीकडून चौकशी…

मुंबई (प्रतिनिधी) :  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा  भाऊ इक्बाल कासकर याला ड्रग्सच्या एका प्रकरणात मुंबईतील नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो  कार्यालयात आणले गेले आहे. त्याची एनसीबीने चौकशी सुरु केली आहे. त्यामुळे डॉन दाऊद इब्राहिमच्या मोठा धक्का मानला जात आहे. इक्बाल कासकर याला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईत अटक केली होती. ड्रग्ज प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा  भाऊ इक्बाल कासकरला… Continue reading अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याची एनसीबीकडून चौकशी…

यळगूड येथे इलेक्ट्रिक मोटरचा शॉक लागून युवकाचा  मृत्यू…

हातकणंगले (प्रतिनिधी) :  यळगूड (ता. हातकणंगले) येथे घराचे बांधकाम सुरु असलेल्या मित्राच्या मदतीसाठी गेलेल्या युवकाचा  इलेक्ट्रीक मोटरचा शॉक लागून मृत्यू झाला. हा प्रकार आज (गुरुवार) घडला. अमोल प्रकाश मिरजे (वय २७, रा. घुणके मळा, यळगूड) असे त्याचे नाव आहे. या घटनेची नोंद हुपरी पोलिस ठाण्यात झाली आहे. शेजारच्या प्लॉटमध्ये मित्राच्या घराचे बांधकाम सुरू आहे. कॉलमसाठी… Continue reading यळगूड येथे इलेक्ट्रिक मोटरचा शॉक लागून युवकाचा  मृत्यू…

कळे येथे मटका घेणाऱ्या दोघांवर गुन्हा… 

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कळे येथे व्यापारपेठ गल्लीत मध्यवस्तीत चाललेल्या जुगार अड्ड्यावर कळे पोलिसांनी छापा टाकला. मोहन विरुपाक्ष नरुटे (वय ५८), तानाजी श्रीपती जाधव (दोघेही रा. कळे) यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस कॉन्स्टेबल जगदिश शिवाजी वीर यांनी फिर्याद दिली आहे. तानाजी जाधव हा मटका अड्ड्याचा मालक असून मोहन नरुटे हा त्याच्याकडे दहा टक्के… Continue reading कळे येथे मटका घेणाऱ्या दोघांवर गुन्हा… 

शेणगांव येथे जुगार अड्ड्यावर छापा : साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील शेणगाव येथे जुगार अड्ड्यावर भुदरगड पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत १३ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर रोख रक्कम, मोबाईल, मोटार सायकली असा एकूण साडेचार लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. शेणगांव येथे पत्यांच्या जुगार चालत असल्याची गोपनीय माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीसांनी शेतातील घरात छापा टाकला असता तिथे… Continue reading शेणगांव येथे जुगार अड्ड्यावर छापा : साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

कीटकनाशकाचे बेकायदा उत्पादन करणाऱ्या गुजरातमधील कंपन्यांवर हातकणंगले पोलिसांची कारवाई

हातकणंगले (प्रतिनिधी) : पर्यावरण व मानवजातीला घातक असणाऱ्या फोरेट या कीटकनाशकाची बेकायदेशीर निर्मिती व विक्री करणाऱ्या JBC crope science, vapi (Gujarat) या उत्पादक व गुजरात किसान फर्टिलायझर (पुरवठाधार) या दोन कंपन्या व कुंभोज येथील बापूसो कृषी सेवा केंद्र या दुकानाचा मालक मदन लक्ष्मण अनुसे (रा. बुवाचे वाठार) याच्यावर हातकणंगले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी… Continue reading कीटकनाशकाचे बेकायदा उत्पादन करणाऱ्या गुजरातमधील कंपन्यांवर हातकणंगले पोलिसांची कारवाई

‘इडी’चा मल्ल्या, मोदी, चोक्सीला दणका : ९३७१ कोटींची संपत्ती जप्त…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील अनेक बँकांचे अब्जावधी रुपये बुडवून परदेशात फरार झालेल्या विजय मल्ल्या, मेहूल चोक्सी आणि नीरव मोदी या तिघांनाही अंमलबजावणी संचालनालय (इडी) ने मोठा दणका दिला आहे. या तिघांचीही एकूण ९३७१ कोटींची संपत्ती जप्त करून सरकारी बँका आणि केंद्र सरकारकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे. ईडीच्या माहितीनुसार विजय मल्ल्या, मेहूल चोक्सी आणि नीरव… Continue reading ‘इडी’चा मल्ल्या, मोदी, चोक्सीला दणका : ९३७१ कोटींची संपत्ती जप्त…

वेतवडे येथे बेकायदेशीर मद्यविक्री करणाऱ्यावर गुन्हा…

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथे काल (बुधवार) रात्री उशीरा बेकायदेशीर देशी-विदेशी मद्याची विक्री केल्याप्रकरणी अशोक दिनकर सुतार (वय ४०) याच्यावर कळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.      वेतवडे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाच्या मागील बाजूस सुतार हा बेकायदेशीर मद्याची विक्री करीत होता. यावेळी पो. ना. सरदार भोसले यांनी काल रात्री उशीरा छापा टाकून… Continue reading वेतवडे येथे बेकायदेशीर मद्यविक्री करणाऱ्यावर गुन्हा…

error: Content is protected !!