घोसरवाड येथे ग्रामसेवकाला मारहाण : एकावर गुन्हा दाखल

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : घोसरवाड (ता. शिरोळ) येथे ग्रामपंचायतीची करवसूलीसाठी गेलेल्या ग्रामसेवकाच्या अंगावर धावून जावून मारहाण केल्याप्रकरणी रंगराव भाऊ कांबळे (रा. काळम्मावाडी वसाहत, घोसरवाड) याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा या कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद ग्रामसेवक संतोष बाबूराव चव्हाण (मूळ रा. वसंतवाडी, ता. पुसद, जि. यवतमाळ, सध्या रा. गणंजयनगर, कुरुंदवाड) यांनी कुरुंदवाड पोलिसांत दिली आहे.… Continue reading घोसरवाड येथे ग्रामसेवकाला मारहाण : एकावर गुन्हा दाखल

तेरवाड येथे अवैध गुटखा पोलीसांनी पकडला : ६ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कर्नाटकातून महाराष्ट्रात गुटखा वाहतूक करताना तेरवाड (ता. शिरोळ) येथे कुरुंदवाड पोलिसांनी कर्नाटकातील दोघांना अटक केले आहे. निहाल राजेश हवालदार (वय २४) आणि मोहम्मदइर्शान साजीद बागवान (वय २९, दोघे रा. निपाणी, कर्नाटक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून ४ लाख ६० हजार रुपयांचा गुटखा आणि चारचाकी स्कोडा कंपनीची गाडी असा एकुण… Continue reading तेरवाड येथे अवैध गुटखा पोलीसांनी पकडला : ६ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

महिला दिनादिवशीच नागांव येथे महिलेच्या घरावर हल्ला…

टोप (प्रतिनिधी) : महिला दिनाच्या दिवशीच तंटामुक्त समितीच्या उपाध्यक्ष आणि मुलांनी ग्रामपंचायतीच्या मागासवर्गीय महिला सदस्यांच्या घरावर हल्ला केला. या हल्लात सदस्यासह पती आणि मुलग्याला घरात घुसून जोरदार मारहाण केली. ग्रामपंचायतीने छापलेलेल्या जाहिरातीत महिला सदस्याच्या नावातील चुकीतून ही घटना घडली. या घटनेची नोंद शिरोली पोलिसात रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती. हातकणंगले तालुक्यातील नागांव येथील महिला दिनानिमित्त आयोजित… Continue reading महिला दिनादिवशीच नागांव येथे महिलेच्या घरावर हल्ला…

खून केलेल्या आरोपीचा पंढरपूर तालुका पोलिसांनी दोन तासात लावला छडा…

पंढरपूर (प्रतिनिधी) : मौज आंबे चिंचोली येथे दगडाने मारल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी घडली होती. याचीमाहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी तपासचक्रे फिरवून अवघ्या दोन तासात आरोपीला अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गणपत बबन जाधव (रा. कार्ला, ता. मावळ,… Continue reading खून केलेल्या आरोपीचा पंढरपूर तालुका पोलिसांनी दोन तासात लावला छडा…

अब्दुललाट येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट येथील गोपी उर्फ कविराज अनिल कांबळे (वय ३२) या तरुणाने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल (सोमवार) सायंकाळच्या सुमारास घडली. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबतची वर्दी अतुल कांबळे यांनी कुरुंदवाड पोलिसांत दिली असून याचा अधिक तपास कुरुंदवाड पोलीस करीत आहेत.

कुडाळमध्ये लाच स्वीकारल्याप्रकरणी वनपाल ताब्यात…

कुडाळ (प्रतिनिधी) : लाकूड वाहतुकीचा परवाना देण्यासाठी तब्बल १५ हजारांची लाच स्विकारल्याप्रकरणी नेरूर तर्फ हवेली येथील वनपाल अनिल राठोड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई सिंधुदुर्ग लाच लुचपत विभागाकडून करण्यात आली. याप्रकरणी राठोड याच्यावर भ्रष्टाचार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदारांनी तुळसुली येथे वनविभागाच्या परवानगीने लाकूड माल… Continue reading कुडाळमध्ये लाच स्वीकारल्याप्रकरणी वनपाल ताब्यात…

शरीर सुखाची मागणी करणाऱ्या अकिवाट माजी जिल्हा परिषद सदस्यावर गुन्हा दाखल

कुरुंदवाड ( प्रतिनिधी ) महिलेची छेडछाड करुन शरीर सुखाची मागणी करणाऱ्या अकिवाट (ता. शिरोळ) येथील माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार याच्या विरुद्ध कुरुंदवाड पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पिढीत महीलेने याबाबतची कुरुंदवाड पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बैरागदार याला अटक केली आहे. पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी बैरागदार हा माजी जिल्हा परिषद सदस्य… Continue reading शरीर सुखाची मागणी करणाऱ्या अकिवाट माजी जिल्हा परिषद सदस्यावर गुन्हा दाखल

‘पतंजली’ने दिशाभूल करणाऱ्या जाहिराती का थांबल्या नाहीत ? सुप्रीम कोर्टाची नोटीस

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) पतंजली आयुर्वेद आणि त्यांचे एमडी आचार्य बाळकृष्ण यांना सर्वोच्च न्यायालयाने अवमान नोटीस बजावली आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे जारी करण्यात आले आहे. याआधी न्यायालयाने पतंजलीला औषधी उत्पादनांबाबत मोठे दावे करणाऱ्या जाहिराती देण्यापासून रोखले होते. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) ॲलोपॅथीच्या विरोधात चुकीच्या माहितीच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने… Continue reading ‘पतंजली’ने दिशाभूल करणाऱ्या जाहिराती का थांबल्या नाहीत ? सुप्रीम कोर्टाची नोटीस

बिकानेर लष्करी कँटीनमध्ये शिजत होतं पाकिस्तानी सौंदर्यवतीचं ‘षडयंत्र’

बिकानेर ( वृत्तसंस्था ) लष्कराचे जवान आणि इतर लोकांना हनी ट्रॅप करून लष्कराशी संबंधित गोपनीय माहिती मिळवण्याची पाकिस्तानची जुनी खेळी आहे. सुंदर सुंदरींच्या वेषात वेळोवेळी लोकांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवले जाते. कधी पैशाचे आमिष दाखवून तर कधी सौंदर्याच्या जाळ्यात अडकून ब्लॅकमेल करून गोपनीय माहिती पाठविण्यास भाग पाडले जाते. गुप्तचर पोलीस वेळोवेळी लोकांना सावध करतात. असे असूनही… Continue reading बिकानेर लष्करी कँटीनमध्ये शिजत होतं पाकिस्तानी सौंदर्यवतीचं ‘षडयंत्र’

घोसरवाड येथे दोन गटात हाणामारी : 30 जणांवर गुन्हा दाखल

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथे शेतजमिनीच्या मालकीवरुन दोन गटांत हाणामारी झाली. या प्रकरणी सावित्री हाल्लाप्पा पुजारी आणि शोभा मायाप्पा पुजारी (दोघीही रा. घोसरवाड) यांनी परस्परविरोधी तक्रार दिली असून दोन्ही गटातील एकूण ३० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना काल (रविवार) रोजी घडली. सावित्री पुजारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी मायाप्पा पुजारी आणि इतर… Continue reading घोसरवाड येथे दोन गटात हाणामारी : 30 जणांवर गुन्हा दाखल

error: Content is protected !!