कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कर्नाटकातून महाराष्ट्रात गुटखा वाहतूक करताना तेरवाड (ता. शिरोळ) येथे कुरुंदवाड पोलिसांनी कर्नाटकातील दोघांना अटक केले आहे. निहाल राजेश हवालदार (वय २४) आणि मोहम्मदइर्शान साजीद बागवान (वय २९, दोघे रा. निपाणी, कर्नाटक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी त्यांच्याकडून ४ लाख ६० हजार रुपयांचा गुटखा आणि चारचाकी स्कोडा कंपनीची गाडी असा एकुण ६ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तेरवाड हेरवाड मार्गांवर आज (सोमवार) रात्री एकच्या सुमारास ही कारवाई केली. या गाडीमध्ये पान मसाला, सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ, प्रिमिअम आरएमडी, सुगंधी सुपारी आढळून आली. दरम्यान, दोघांना जयसिंगपूर न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

ही कारवाई कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर पवार, सागर खाडे, नागेश केरीपाळे यांनी केली.