पोलीस तपासात दिलेला जबाब हा पुरावा होऊ शकत नाही – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान म्हटले आहे की, पोलीस तपासात दिलेला जबाब हा पुरावा होऊ शकत नाही असं म्हटलं आहे. यामुळे अनेक प्रकरणात नोंदवला गेलेला जबाब पुरावा ठरु शकत नाही याची नोंद नागरिकांनी घेणे आवश्यक आहे. मिळालेल्या माहितीनुसार न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने 30… Continue reading पोलीस तपासात दिलेला जबाब हा पुरावा होऊ शकत नाही – सर्वोच्च न्यायालय

LGBT समुदायाला मोठा धक्का; सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाह मान्यतेस दिला नकार

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ऐतिहासिक निर्णय देताना समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला आहे. भारताचे सरन्यायाधीश (CJI) DY चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्ती एस रवींद्र भट्ट आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांचा समावेश असलेल्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. निर्णयात न्यायमूर्ती कोहली, न्यायमूर्ती भट्ट आणि न्यायमूर्ती… Continue reading LGBT समुदायाला मोठा धक्का; सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाह मान्यतेस दिला नकार

सरन्यायाधीशांनी राहुल नार्वेकरांवर तीव्र शब्दांत ओढले ताशेरे

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील आमदार अपात्रतेसंदर्भात अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून योग्य ती पावले उचलण्यात न आल्यामुळे न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नार्वेकरांवर सुनावणी प्रलंबित ठेवल्यावरून तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी प्रलंबित आहे. या प्रक्रियेत मुद्दामहून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ठाकरे गटाने केलेल्या… Continue reading सरन्यायाधीशांनी राहुल नार्वेकरांवर तीव्र शब्दांत ओढले ताशेरे

राष्ट्रवादी पक्ष, चिन्हावरील पुढील सुनावणी सोमवारी होणार

नवी दिल्ली: राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर आज निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरू होती. या सुनावणीला स्वत: शरद पवार उपस्थित होते. ही सुनावणी आता संपली असून पुढील सुनावणी येत्या सोमवारी 4 वाजता घेतली जाणार आहे. या सुनावणीत  दोन्ही गटांकडून मोठे दावे-प्रतिदावे करण्यात आले. पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेल्यामुळे आमदारांची संख्या महत्त्वाची आहे आणि आमच्याकडे सर्वाधिक आमदार असल्याचा दावा… Continue reading राष्ट्रवादी पक्ष, चिन्हावरील पुढील सुनावणी सोमवारी होणार

आम्हाला शिकवावे लागेल का ? सरन्यायाधिश मुंबई उच्च न्यायालय न्यायाधीशांवर संतापले..!

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) देशाचे सरन्यायाधीश (CJI) न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर संतापले. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्हर्च्युअल किंवा हायब्रिड पद्धतीने सुनावणी घेत नसल्याने सरन्यायाधिशांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत सर्व न्यायाधीशांना नवीन तंत्रज्ञान शिकावे लागेल का ? असा सवाल केला. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वेश माथूर विरुद्ध पंजाब आणि हरियाणा… Continue reading आम्हाला शिकवावे लागेल का ? सरन्यायाधिश मुंबई उच्च न्यायालय न्यायाधीशांवर संतापले..!

शिवसेना कोणाची, पक्षचिन्हाबाबत शुक्रवारी सुनावणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेना कोणाची, धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाला मिळणार? याबाबत दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी आज झाली. पक्षातंर्गत निवडणुका घेऊ द्या, कोर्टाचा निर्णय येईपर्यंत निकाल देऊ नये, अशी विनंती आयोगाला ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली. आता या मुद्द्यावरील पुढील सुनावणी निवडणूक आयोगात शुक्रवार, दि. २० जानेवारी होणार आहे. ठाकरे गट आणि… Continue reading शिवसेना कोणाची, पक्षचिन्हाबाबत शुक्रवारी सुनावणी

तेरणी येथील तरुणास २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

गडहिंग्लज (प्रतिनिधी): तालुक्यातील तेरणी येथील अनिल केंपाण्णा भोई (वय ३०) या तरुणाला बारा वर्षीय मुलीवर जबरी अत्याचार केल्याच्या आरोपाखाली २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. येथील अतिरिक्त सत्र तथा विशेष पोक्सो न्यायाधीश ए. आर. उबाळे यांनी निकाल दिला. आरोपी अनिल भोई हा मूळचा कर्नाटकचा आहे. अनेक वर्षांपासून तो नातेवाइकांकडेच राहतो. एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन… Continue reading तेरणी येथील तरुणास २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना एक वर्षांची शिक्षा

नागपूर (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे माजी मंत्री आणि नागपूर जिल्ह्यातील सावनेर विधानसभेचे आमदार सुनील केदार यांना कोर्टाने एका गुन्ह्यात कोर्टाने एक वर्षांची शिक्षा सुनावली आहे. नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने याबाबतचा निकाल दिला आहे. नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर येथे अति उच्च दाबवाहिनीचे काम करणाऱ्या महापारेषणच्या सहायक अभियंत्यासह मारहाण केल्या प्रकरणात संदर्भात आमदार सुनील केदार यांच्यावर गुन्हा दाखल… Continue reading काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना एक वर्षांची शिक्षा

आ. अनिल परब, सदानंद कदम यांना जामीन मंजूर

दापोली : साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणी दापोली न्यायालयाने ठाकरे गटाचे आमदार अनिल परब व सदानंद कदम यांना १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. साई रिसॉर्ट बांधकाम करताना सीआरझेड नियमांचे उल्लंघन केल्याचा या दोघांवर आरोप आहे. त्यात हा जामीन मंजूर झाला आहे. या सुनावणीसाठी हे दोघेही दापोली न्यायालयात हजर होते. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या… Continue reading आ. अनिल परब, सदानंद कदम यांना जामीन मंजूर

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी आता १४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाइन डेला होणार आहे. बोर्डावर पहिल्या क्रमांकाचे प्रकरण असेल, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे प्रकरण वर्ग करण्याबाबतचा निर्णयही १४ फेब्रुवारीलाच होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात आज १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश वाय. एस. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच… Continue reading महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

error: Content is protected !!