नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान म्हटले आहे की, पोलीस तपासात दिलेला जबाब हा पुरावा होऊ शकत नाही असं म्हटलं आहे. यामुळे अनेक प्रकरणात नोंदवला गेलेला जबाब पुरावा ठरु शकत नाही याची नोंद नागरिकांनी घेणे आवश्यक आहे.


मिळालेल्या माहितीनुसार न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने 30 ऑक्टोबर रोजी एका प्रकरणाचा निकाल देताना हे मत नोंदवले आहे.

”कलम 161 नुसार पोलीस तपासा दरम्यान दिलेला जबाब हे साक्षीदाराची उलट तपासणी करण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यावेळी जर त्यांच्या जबाबात फरक झाला तर जरी बचाव पक्ष त्यांचा जबाब खोडून काढण्यात यशस्वी झाला तरी दोन वेगवेगळ्या जबाबामुळे गोंधळ उडू शकतो’, असे मत न्यायालयाने मांडले आहे. 2007 च्या राजस्थान उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत बोलताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हे मत नोंदवले आहे.