नागपूर (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे माजी मंत्री आणि नागपूर जिल्ह्यातील सावनेर विधानसभेचे आमदार सुनील केदार यांना कोर्टाने एका गुन्ह्यात कोर्टाने एक वर्षांची शिक्षा सुनावली आहे. नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने याबाबतचा निकाल दिला आहे.

नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर येथे अति उच्च दाबवाहिनीचे काम करणाऱ्या महापारेषणच्या सहायक अभियंत्यासह मारहाण केल्या प्रकरणात संदर्भात आमदार सुनील केदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणी गेले अनेक दिवस सुनावणी सुरू होती. आज (१३ जानेवारी) कोर्टाने या प्रकरणी निर्णय देताना सुनील केदार यांना शिक्षा सुनावली आहे.

सावनेरचे आमदार व माजी मंत्री सुनील केदार यांना नागपूर जिल्हा न्यायालयानं एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. ६ ऑक्टोबर २०१६ रोजी महापारेषणतर्फे कोराडी-तिडंगीदरम्यान अति उच्चदाब वीजवाहिनी टाकण्याचे काम सुरू होते. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीही अधिग्रहित करण्यात आल्या होत्या.

वाहिनीसाठी येथे मोठमोठे मनोरे उभारण्यात आलेले. ६ ऑक्टोबर २०१६ रोजी महापारेषणचे सहाय्यक अभियंता अमोल खुबाळकर हे दोन-तीन अधिकाऱ्यांसह तेलगाव येथे शेतकऱ्यांशी त्यांच्या पिकहानीच्या भरपाईसंबंधी वाटाघाटी करण्यासाठी गेले होते. अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच आमदार सुनील केदार त्यांच्या सुमारे २० सहकाऱ्यांसह तेथे पोहोचले होते.