सुप्रीम कोर्टाची शेतकरी संघटनांना  नोटीस..

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे गेल्या २० दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दिल्लीचे रस्ते रोखून धरलेल्या आंदोलक शेतकऱ्यांना सुरक्षेच्या कारणास्तव हटविण्यासाठी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर आज (बुधवार) सुनावणी झाली. शेतकरी संघटनांना सुप्रीम कोर्टाने नोटीस जारी केली असून उद्यापर्यंत रस्ता रोखणाऱ्या शेतकऱ्यांची नावे देण्यास… Continue reading सुप्रीम कोर्टाची शेतकरी संघटनांना  नोटीस..

सर्वोच्च न्यायालयाकडून प्रताप सरनाईकांना मोठा दिलासा ; ईडीला दिले ‘हे’ आदेश

ठाणे (प्रतिनिधी) : मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने कारवाईचा बडगा उगारला आहे. पण आता सर्वोच्च न्यायालयाने प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा दिला असून ईडीकडून चौकशी सुरू असताना व्हिडिओ चित्रिकरण करण्यास परवानगी दिली आहे. दिल्लीतून आलेल्या ईडीच्या पथकाने २४ नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर ईडीने चौकशीसाठी प्रताप सरनाईक… Continue reading सर्वोच्च न्यायालयाकडून प्रताप सरनाईकांना मोठा दिलासा ; ईडीला दिले ‘हे’ आदेश

सर्वोच्च न्यायालयाचा अर्णव गोस्वामी यांना झटका…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या आईच्या आत्महत्याप्रकरणी जामिनावर सुटलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला आहे. रिपब्लिक टीव्हीवरील सर्व गुन्हे मागे घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. गोस्वामी यांनी रिपब्लिक टीव्हीवर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करावे, त्याचबरोबर या प्रकरणी सीबीआयकडून चौकशी करावी, अशा मागण्याची… Continue reading सर्वोच्च न्यायालयाचा अर्णव गोस्वामी यांना झटका…

सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं अर्णबला जामीन मंजूर करण्याचे कारण…

मुंबई (प्रतिनिधी) : इंटीरिअर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांची आई कुसुम यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोप ठेवण्यात आले होते. या प्रकरणी उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ११ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला होता.… Continue reading सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं अर्णबला जामीन मंजूर करण्याचे कारण…

हायकोर्टाने मुंबई महापालिकेला ‘कंगना’वरून फटकारले…

मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेत्री कंगना रणौतविरोधात मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेली कारवाई सूडबुद्धीने असल्याचं सांगत मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारले आहे. त्याचप्रमाणे कंगनाला महापालिकेला पाठविण्यात आलेली नोटीस रद्द करण्यात आली आहे. कंगना तिच्या कार्यालयाचा ताबा घेण्यास परवानगी देण्यात आली असली तरी कंगनाने सरकारविरोधात मत व्यक्त करताना संयम बाळगला पाहिजे, असे सुनावले आहे. मुंबई महापालिकेकडून १० सप्टेंबर… Continue reading हायकोर्टाने मुंबई महापालिकेला ‘कंगना’वरून फटकारले…

‘अर्णव गोस्वामी’प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला झटका…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिपब्लिक टीव्हीचे प्रमुख संपादक अर्णव गोस्वामी यांना हक्कभंगाची नोटीस पाठवणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या सचिवांना कारणे दाखवा नोटीस का बजावली जाऊ नये, अशी विचारणा करीत सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्यावर ताशेरे झाडले आहेत. तसेच पुढील सुनावणीपर्यंत हक्कभंगाच्या प्रकरणामध्ये गोस्वामी यांना अटक केली जाऊ नये असं सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केले. सुशांतसिंग रजपूत… Continue reading ‘अर्णव गोस्वामी’प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला झटका…

अविश्वास ठरावाविरोधात जिल्ह्यातील सहा लोकनियुक्त सरपंचांची हायकोर्टात धाव

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यातील सहा गावाच्या लोकनियुक्त सरपंचांविरुद्ध अविश्वासाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून प्रसंगी रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा अविश्वास ठराव मंजूर झालेल्या सरपंचांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषदेत दिला. यामध्ये सौ. अनिता सचिन पाटील (कोते, ता. राधानगरी),  दत्तात्रय कांबळे (हिरवडे, ता. करवीर ) यांचेसह जिल्ह्यातील ६ सरपंचांचा… Continue reading अविश्वास ठरावाविरोधात जिल्ह्यातील सहा लोकनियुक्त सरपंचांची हायकोर्टात धाव

सुप्रीम कोर्टाने फेटाळली महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची याचिका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रामध्ये राष्ट्पती राजवट लागू करण्याबाबत दाखल करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टाकडून फेटाळण्यात आली आहे. राज्यातील ठाकरे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबतची याचिका विक्रम गेहलोत यांनी दाखल केली होती. मात्र आज (शुक्रवार) या याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाने नकार दिला असून आपण राष्ट्रपतींकडे जाऊ शकता अशा शब्दांत याचिकाकर्त्याला सुनावले आहे. यामुळे… Continue reading सुप्रीम कोर्टाने फेटाळली महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची याचिका

कृषी विधेयकांवरून सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला नोटीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोदी सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीचा दावा करत तीन कृषि विधेयके मंजूर करून घेतली. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकांचे कायद्यात रुपांतर झाले. पण देशाच्या काही भागातील शेतकऱ्यांकडून मोदी सरकारच्या या कृषि कायद्यांना विरोध होत आहे. सर्वोच्च न्यायालयात तिन्ही कायद्यांना आव्हान देण्यात आले आहे. आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी केंद्र… Continue reading कृषी विधेयकांवरून सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला नोटीस

बाबरी मशीद प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष : विशेष न्यायालय

लखनऊ (वृत्तसंस्था) : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात तब्बल २८ वर्षानंतर विशेष न्यायालयात आज (बुधवार) निर्णय सुनावला. यावेळी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निकाल देण्यात आला. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर फैजाबादमध्ये दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या. यातील एक एफआयआर लाखो कारसेवकांविरोधात दाखल करण्यात आली होती, तर दुसरी एफआयआर… Continue reading बाबरी मशीद प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष : विशेष न्यायालय

error: Content is protected !!