नुकसानग्रस्त भागाची केंद्रीय पथकाकडून मंगळवारी पाहणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पूर व भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आज (सोमवार) कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येणार आहे.  त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार दि. 4 ऑक्टोबर रोजी सायं. 6.30 वा. कोल्हापूर येथे आगमन व मुक्काम. मंगळवार दि. 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आगमन. सकाळी 8 ते 9 वा.… Continue reading नुकसानग्रस्त भागाची केंद्रीय पथकाकडून मंगळवारी पाहणी

रेंदाळ येथे ‘ई पीक’ पाहणीची सुरूवात

रांगोळी (प्रतिनिधी) :  रेंदाळ (ता. हातकणंगले) येथे महाराष्ट्र शासनाने नवीन चालू केलेल्या ऑनलाईन ‘ई पीक’ पाहणी योजनेची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. यावेळी रेंदाळ  गावाचे तलाठी महादेव पाटील यांनी शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर जाऊन  आपल्या पिकांची ऑनलाइन नोंदणी कशी करायची, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित सर्व शेतकऱ्यांना मोबाईलमध्ये ‘ई पीक’ पाहणी ॲप घेऊन कशाप्रकारे नोंदणी करायची, याबद्दल… Continue reading रेंदाळ येथे ‘ई पीक’ पाहणीची सुरूवात

राजाराम कारखान्यातर्फे पूरबाधित सभासदांना क्रेडिटवर ऊस बियाणे : महादेवराव महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  अतिवृष्टीमुळे आलेल्या महापूराने नदीकाठच्या संपूर्ण पिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे. अशा नदीकाठच्या  सभासद शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी राजाराम कारखान्याने मदतीचा हात पुढे केला आहे. त्याच क्षेत्रात ऊसाची पूर्नलागण करण्यासाठी ऊस बियाणे अथवा ऊस रोपे क्रेडिटवर देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. अशी माहिती कारखान्याचे… Continue reading राजाराम कारखान्यातर्फे पूरबाधित सभासदांना क्रेडिटवर ऊस बियाणे : महादेवराव महाडिक

भू-विकास बँकेच्या थकीत शेतकरी कर्जदारांच्या कर्जमाफीचा निर्णय…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील भू-विकास बॅकेच्या थकीत शेतकरी कर्जदारांची कर्जमाफी करण्याचा निर्णय मंत्रालयीन बैठकीत नुकताच घेण्यात आला आहे. शिवसेनेचे आ. प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील या थकित शेतक-यांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केल्याबद्द्ल भूविकास बॅक शेतकरी बचाव कृती समितीच्या शेतक-यांनी त्यांचा सत्कार करून आभार मानले. तसेच या थकीत कर्जदार शेतक-यांच्या प्रश्नांना वेळोवेळी वाचा फोडल्याबद्दल ‘लाईव्ह मराठी’चेही… Continue reading भू-विकास बँकेच्या थकीत शेतकरी कर्जदारांच्या कर्जमाफीचा निर्णय…

राशिवडे येथे कृषी विज्ञान मंडळ शाखेचे उद्घाटन

राशिवडे (प्रतिनिधी)  : शेतीला आधुनिक शास्त्राची जोड देऊन योग्य मार्गदर्शन घेऊन  शेती उत्पन्न कसे वाढवावे, याविषयी कृषी विज्ञान मंडळामार्फत शेतकऱ्यांना प्रबोधित केले जाते. याची व्याप्ती वाढावी म्हणून या मंडळामार्फत गावोगावी कृषी मित्रांची नेमणूक केली आहे. राशिवडे बुद्रुक येथे सुरेश गोंगाने आणि रूपेश सरनाईक या दोघांची कृषीमित्र म्हणून निवड केली आहे. राशिवडे परिसरातील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर… Continue reading राशिवडे येथे कृषी विज्ञान मंडळ शाखेचे उद्घाटन

यळगुड येथे ‘ई पीक’ पाहणी योजनेस सुरूवात   

रांगोळी (प्रतिनिधी) : यळगुड (ता. हातकणंगले) येथे महाराष्ट्र शासनाने नवीन चालू केलेल्या ऑनलाईन ई पीक पाहणी योजनेची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. यावेळी हुपरी मंडळ अधिकारी अजित साठे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन  शेतकऱ्यांना आपल्या पिकाचे ऑनलाइन नोंदणी करणे बाबत मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित सर्व शेतकऱ्यांना मोबाईलमध्ये ई पीक पाहणी ॲप घेऊन कशाप्रकारे नोंदणी करायची याबद्दल सविस्तर… Continue reading यळगुड येथे ‘ई पीक’ पाहणी योजनेस सुरूवात   

कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्तीसाठी महावितरणची ऐतिहासिक योजना…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कृषीपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त करण्यासाठी जुन्या थकबाकीमध्ये तब्बल ६६ टक्के सूट देण्यात येत आहे. शिल्लक थकबाकीपैकी ५० टक्के थकबाकी येत्या मार्च २०२२ पर्यंत भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकीदेखील माफ करण्यात येत आहे. सद्यस्थितीत महावितरणची आर्थिक स्थिती अतिशय खालावली आहे. त्यामुळे थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग नाही व चालू वीजबिलांचा… Continue reading कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्तीसाठी महावितरणची ऐतिहासिक योजना…

…तर शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित होणार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कृषीपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त करण्यासाठी जुन्या थकबाकीमध्ये तब्बल ६६ टक्के सूट दिली आहे. शिल्लक थकबाकीपैकी ५० टक्के थकबाकी येत्या मार्च २०२२ पर्यंत भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकीदेखील माफ करण्यात येणार आहे. दरम्यान, थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग न होता चालू वीजबिलांचा भरणा  न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची… Continue reading …तर शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित होणार

राज्यात येत्या चार दिवसांत पावसाचा जोर वाढणार

नागपूर (प्रतिनिधी) : गेल्या महिनाभराच्या खंडानंतर पुन्हा राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीदरम्यान चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाल्याने पूर्व विदर्भासह महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. येत्या चार दिवसांत मध्य महाराष्ट्रासह विदर्भात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने… Continue reading राज्यात येत्या चार दिवसांत पावसाचा जोर वाढणार

कृषीमूल्य आयोग एफआरपी ठरवताना सरकारची सोय बघते : राजू शेट्टी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कृषीमूल्य आयोग एफआरपी ठरवताना सरकारची सोय बघून ठरवते की उत्पादन खर्च पाहून हे अगोदर स्पष्ट करावे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या पदरात काहीच पडत नाही, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. ते कृषी मूल्य आयोगाने आज (बुधवार) एफआरपीमध्ये ५० रूपयांची वाढ केल्यावर ते बोलत होते.   राजू शेट्टी म्हणाले… Continue reading कृषीमूल्य आयोग एफआरपी ठरवताना सरकारची सोय बघते : राजू शेट्टी

error: Content is protected !!