‘ई-पीक पाहणी’ ॲपवर शेतकऱ्यांनी पिक स्थितीची नोंद करावी : महसूल विभागाचे आवाहन…

मुंबई / राशिवडे (प्रतिनिधी) : पीक पेरणीबाबतची माहिती गाव नमुना नंबर १२ मध्ये नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत: भ्रमणध्वनीवरील ॲपद्वारा उपलब्ध करून देण्याबाबतचा ‘ई-पीक पाहणी’ कार्यक्रम राबविण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी शासनाने १५ ऑगस्टपासून सुरु केली आहे. पीक पेरणी अहवालाची वस्तुनिष्ठ माहिती संकलित होण्यासाठी आणि पीक विमा, पीक पाहणी दावे निकालात काढण्यासाठी टाटा ट्रस्टच्या सहकार्याने हे ॲप विकसित करण्यात… Continue reading ‘ई-पीक पाहणी’ ॲपवर शेतकऱ्यांनी पिक स्थितीची नोंद करावी : महसूल विभागाचे आवाहन…

राज्यात जोरदार पावसाचा अंदाज : ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट  

पुणे (प्रतिनिधी) : जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये हाहाकार उडाला होता. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाने दडी मारली. आता पुन्हा या आठवड्यात पाऊस पडण्याचा अंदाज   हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात १७ व १८ ऑगस्ट रोजी सर्वत्र मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीलगत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असल्याने पावसाला… Continue reading राज्यात जोरदार पावसाचा अंदाज : ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट  

सोलापूर जिल्ह्यात ‘गोकुळ’चे क्‍लस्‍टर बल्‍क कुलरद्वारा दूध संकलन  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अकोला (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथील श्री. आदर्श महिला सहकारी दूध संस्थेत गोकुळ दूध संघाच्या बल्‍क मिल्‍क कुलर युनिटचे उद्घाटन गोकुळचे चेअरमन विश्‍वास पाटील यांच्‍या हस्ते करण्यात आले. शेतकरी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन नानासाहेब लिगाडे यांच्या अध्‍यक्षतेखाली आणि संघाच्‍या संचालक मंडळाच्‍या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.  यावेळी लिगाडे म्‍हणाले की, १५ हजार लिटर्स क्षमतेच्या… Continue reading सोलापूर जिल्ह्यात ‘गोकुळ’चे क्‍लस्‍टर बल्‍क कुलरद्वारा दूध संकलन  

जाचक अटींमुळे भरपाई मिळविताना शेतकरी हवालदिल…  

रांगोळी (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्याला २०१९ नंतर पुन्हा एकदा यंदा अतिवृष्टी आणि महापूराचा मोठा फटका बसला. पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच सरकारकडून नुकसान भरपाई मिळविण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करताना शेतकरी हवालदिल झाला आहे. पंचनामा करण्यासाठी शासनाने लावलेल्या जाचक अटीमुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना स्मार्ट फोनवरती नोटकँम कँमेऱ्याने… Continue reading जाचक अटींमुळे भरपाई मिळविताना शेतकरी हवालदिल…  

छ. शाहू कारखाना पूरबाधित भागातील ऊस अग्रक्रमाने तोडणार : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) :  यावर्षी महापुरामुळे ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः नदी काठाशेजारील ऊस पंधरा दिवसांपेक्षा जास्त दिवस बुडाल्यामुळे या पिकांचे तसेच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चालू गळीत हंगामात शाहू साखर कारखाना अशा  पूरबाधित भागातील ऊस अग्रक्रमाने तोडणार असून शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. अशी घोषणा शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे… Continue reading छ. शाहू कारखाना पूरबाधित भागातील ऊस अग्रक्रमाने तोडणार : समरजितसिंह घाटगे

धामणी खोऱ्यातील नुकसानग्रस्त शेतींचे त्वरीत पंचनामे करावेत : शेतकऱ्यांची मागणी

कळे (प्रतिनिधी) :  पन्हाळा तालुक्यातील धामणी खोऱ्यामध्ये सावर्डे, आंबर्डे, पणुत्रे, हरपवडे, निवाचीवाडी या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे डोंगरांचे भूस्खलन होऊन  शेकडो एकर जमीनीवरील पिके गाडली गेली आहेत. त्यामुळे येथील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. पन्हाळा तालुक्याचे शेवटचे टोक असणाऱ्या हरपवडे आणि निवाचीवाडी येथे भूस्खलन होऊन शेतीपिकांचे नुकसान… Continue reading धामणी खोऱ्यातील नुकसानग्रस्त शेतींचे त्वरीत पंचनामे करावेत : शेतकऱ्यांची मागणी

तांबाळे-अथनी शुगर लिमिटेडचे साडेचार लाख टन गाळपाचे उद्धिष्ट : नामदेव भोसले

कडगांव (प्रतिनिधी) : अथनी शुगर्स भुदरगड युनीट तांबाळे साखर कारखान्याचा २०२१-२२ या ६ व्या गळीत हंगामाचे मिल रोलर पूजन आज (शुक्रवार) करण्यात आले. कारखाना व्यवस्थापनाने ठरवलेले साडेचार लाख मेट्रीक टन गाळपाचे उदिष्ट पूर्ण करण्याचा विश्वास कारखान्याचे चिफ इंजिनियर नामदेव भोसले यांनी व्यक्त केला. तसेच या उद्धिष्टानुसार आम्ही कारखान्यातील सर्व कामे वेळेत पूर्ण करणार असल्याचे त्यांनी… Continue reading तांबाळे-अथनी शुगर लिमिटेडचे साडेचार लाख टन गाळपाचे उद्धिष्ट : नामदेव भोसले

गगनबावडा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीचे प्रशासनाने पंचनामे करावेत : शेतकऱ्यांची मागणी

साळवण (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यात शेती आणि घरांचे महापुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. याचे प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन सांगशी सैतवडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने गगनबावडा तहसिलदार संगमेश कोडे यांना देण्यात आले. गगनबावडा तालुक्यातील २० ते २५ गावातील नागरिक आणि शेतकऱ्यांच्या प्रापंचिक साहित्यांचे, घरांचे आणि… Continue reading गगनबावडा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीचे प्रशासनाने पंचनामे करावेत : शेतकऱ्यांची मागणी

‘गोकुळ’तर्फे स्‍वयंसेवकांना जनावरांच्‍या आयुर्वेदिक औषधोपचाराचे प्रशिक्षण

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाच्या आनंदराव पाटील – चुयेकर प्रशिक्षण केंद्रामार्फत दूध संस्था सदस्‍य, सचिव व दूध उत्‍पादक शेतकरी, महिलांना प्रशिक्षण दिले जाते. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आर. बी. पी. स्‍वयंसेवकांना जनावरांवरील आयुर्वेदिक औषधोपचार प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन आज (गुरुवार) ताराबाई पार्क येथील प्रशिक्षण केंद्रामध्ये संघाचे चेअरमन विश्‍वास नारायण पाटील यांचे हस्‍ते झाले. आर.बी.पी. स्‍वयंसेवकांसाठी हा प्रशिक्षण… Continue reading ‘गोकुळ’तर्फे स्‍वयंसेवकांना जनावरांच्‍या आयुर्वेदिक औषधोपचाराचे प्रशिक्षण

धामोड परिसरात रोपलागणीला वेग…

धामोड (प्रतिनिधी) : तब्बल एक महिन्याच्या अविरत पावसाच्या विश्रांतीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. परंतु, काल दुपारनंतर पावसाने सर्वत्र हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. त्यामुळे धामोड परिसरात रोप लागणीला वेग आला आहे. यावर्षी रोहीणी नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्याने या नक्षत्रातच जवळपास सर्व शेतकऱ्यांची पेरणीची कामे पूर्ण झाली. परंतु त्यानंतर निम्मा मृग आणि आद्रा नक्षत्र… Continue reading धामोड परिसरात रोपलागणीला वेग…

error: Content is protected !!