रांगोळी (प्रतिनिधी) : यळगुड (ता. हातकणंगले) येथे महाराष्ट्र शासनाने नवीन चालू केलेल्या ऑनलाईन ई पीक पाहणी योजनेची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.

यावेळी हुपरी मंडळ अधिकारी अजित साठे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन  शेतकऱ्यांना आपल्या पिकाचे ऑनलाइन नोंदणी करणे बाबत मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित सर्व शेतकऱ्यांना मोबाईलमध्ये ई पीक पाहणी ॲप घेऊन कशाप्रकारे नोंदणी करायची याबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी शेतकऱ्यांनी या योजनेबद्दल माहिती घेऊन समाधान व्यक्त केले. यावेळी तलाठी आरती चौगुले, कोतवाल, शेतकरी उपस्थित होते.