कोल्हापूर (प्रतिनिधी) : पूर व भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आज (सोमवार) कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येणार आहे.  त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार दि. 4 ऑक्टोबर रोजी सायं. 6.30 वा. कोल्हापूर येथे आगमन व मुक्काम. मंगळवार दि. 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आगमन. सकाळी 8 ते 9 वा. पूर व भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात बैठक (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय). सकाळी  9.05 वा. शिरोळकडे प्रयाण (पुरामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी).  सकाळी 10 वा. शिरोळ येथे आगमन.  सकाळी 10 ते 11 वा. नृसिंहवाडी, ता. शिरोळ येथे पुरामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी व नुकसानग्रस्त दुकानदारांशी चर्चा. सकाळी 11 ते 12 वा. कुरूंदवाड येथे पुरामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा. दुपारी 12 वा. सांगलीकडे प्रयाण.