अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन विश्व सावली चॅरिटेबल ट्रस्ट कडून अनोख्या रीतीने साजरा.

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन विश्व सावली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अनोख्या रीतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये कोरोना काळात अखंड अथक पणाने रुग्णांची सेवा करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.  राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष मोतीलाल चव्हाण, उपाध्यक्ष दिलीप लोखंडे संस्थेचे सदस्य निखिल मोरे, यांच्या हस्ते इंदिरा आय.व्ही.फ चे प्रमुख… Continue reading अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन विश्व सावली चॅरिटेबल ट्रस्ट कडून अनोख्या रीतीने साजरा.

‘स्मृतिमोहोर’ एकांकिकेच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक डॉ. व्ही. टी. पाटील यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणाऱ्या ‘स्मृतिमोहोर’ या जयश्री दानवे लिखित एकांकिकेच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतीकुमार पाटील यांच्या हस्ते झाले. जयश्री दानवे यांचे हे ३२ वे पुस्तक असून, यावेळी त्यांनी पुस्तकाच्या १००० प्रती ताराराणी संस्थेला… Continue reading ‘स्मृतिमोहोर’ एकांकिकेच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

मला बाबासाहेब पुरंदरे यांचे लिखाण पटले नाही : शरद पवार  

पुणे : ‘मला बाबासाहेब पुरंदरे यांचे लिखाण कधीच पटले नाही, पुरंदरेंची भाषणे, लिखाण, पुस्तके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्याय केला. सत्यावर आधारित नवा इतिहास नव्या पिढीला आपणास द्यायचा आहे. पाखंडी इतिहास नको, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका केली आहे. श्रीमंत कोकाटे लिखित ‘शिवचरित्र आणि विचारप्रवाह’ या ग्रंथाचा प्रकाशन… Continue reading मला बाबासाहेब पुरंदरे यांचे लिखाण पटले नाही : शरद पवार  

प्रा. आनंद गिरी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

पन्हाळा (प्रतिनिधी) : येथील पर्णाल इतिहास संशोधन मंडळ व सुरभि सांस्कृतिक एवं सामाजिक युवा संघटन, आपटी यांच्यावतीने आपटी येथील लोकसंस्कृती आणि इतिहास अभ्यासक प्रा. आनंद गिरी यांच्या ऐतिहासिक लेखांच्या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. डॉ. राजेंद्र पोंदे याच्या अध्यक्षतेखाली झाले. प्रा. आनंद गिरी हे महाराष्ट्रातील लोकसंस्कृती व लोककलावंत यांच्या संशोधन क्षेत्रातील सुपरिचित असे नाव आहे. १९८५ ते… Continue reading प्रा. आनंद गिरी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

अनिरुद्ध गुरव यांच्या ‘आठवणीतला गाव’ चे प्रकाशन

कपिलेश्वर (प्रतिनिधी) : सध्या भौतिक सुख-समृध्दी हव्यास व विकासाच्या नावाखाली खेडेगावातील पूर्वीच्या समृध्द ग्रामसंस्कृतीच्या महान वारसाचे एक-एक खिळे निखळत चालले आहेत. हे समाज स्वास्थ्य व असित्वाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. या सर्वांची पुन्हा अनुभूती घ्यावयाची असेल तर अनिरुध्द गुरव लिखित ‘आठवणीतला गाव’ हा ललित लेखसंग्रह दुर्बीण ठरेल, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित लेखक किरण… Continue reading अनिरुद्ध गुरव यांच्या ‘आठवणीतला गाव’ चे प्रकाशन

मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड

लातूर (प्रतिनिधी) : लातुरच्या उदगीर येथे होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संमेलनाचा अध्यक्ष निवडण्यासाठी आज (रविवार) उदगीर येथे महामंडळाची बैठक झाली. यावेळी अध्यक्षपदासाठी सासणे यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब केले.     सासणे यांच्यासोबतच अनिल अवचट, अच्युत गोडबोले, डॉ. रामचंद्र देखणे यांचीही नावे चर्चेत… Continue reading मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड

शरद पवारांकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांवर स्तुतीसुमने    

नाशिक (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञानवादी होते. गाय उपयुक्त पशू असून तिचा लाभ घ्या, असे त्यांचे मत होते. सावरकर यांचे लिखाण अजरामर झाले असून त्यांचे व्यक्तिमत्व  आगळेवेगळे होते. स्वातंत्र्यसाठीचे त्यांचे योगदान अतुलनीय होते. त्यामुळेच त्यांच्या बाबतीत वाद होणे दुर्दैवी आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  यांनी आज (सोमवार) येथे म्हटले आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप… Continue reading शरद पवारांकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांवर स्तुतीसुमने    

कोल्हापुरच्या सोनाली नवांगुळ यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नवी दिल्ली येथील साहित्य अकादमीचे आज अनुवाद पुरस्कार जाहीर करण्यात आले. मराठी भाषेत हा पुरस्कार कोल्हापूरच्या सोनाली नवांगुळ यांनी केलेल्या ‘मध्यरात्री नंतरचे तास’ या अनुवादित कादंबरीला जाहीर करण्यात आला. सलमा यांच्या मूळ तमिळ भाषेतील कादंबरीचा हा अनुवाद आहे. त्यांच्या जाँयस्टिक या ग्रंथाला दमसा सभेचा पुरस्कार यापूर्वी मिळालेला आहे. या पुरस्काराचे स्वरुप स्मृतिचिन्ह,… Continue reading कोल्हापुरच्या सोनाली नवांगुळ यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर…

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांच्या ‘कथा आणि व्यथा’ पुस्तकाचे प्रकाशन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सूक्ष्म,  लघु व मध्यम उद्योजकांच्या कथा आणि व्यथा या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आज (सोमवार) पार पडला. ज्येष्ठ अर्थतज्ञ व साहित्यिक प्राचार्य जे. के. पवार यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कोल्हापुरातील शुभंकर पब्लिकेशन्स प्रा. लि. या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या या पुस्तकामध्ये लेखक संजय कात्रे यांनी त्यांच्या ३७ वर्षातील बँकिंगच्या अनुभवातून… Continue reading सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांच्या ‘कथा आणि व्यथा’ पुस्तकाचे प्रकाशन

मी ‘गोकुळ’च्या रिंगणातच… अफवांवर विश्वास ठेवू नका ! : रवींद्र आपटे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मी गोकुळ संघाच्या निवडणूक रिंगणात उतरलो आहेच. मात्र, तब्येतीच्या कारणास्तव मी या निवडणुकीमध्ये उतरणार नसल्याची चर्चा जाणीवपूर्वक विरोधक करत आहेत. या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन गोकुळ दूध संघाचे चेअरमन रवींद्र आपटे यांनी पत्रकाद्वारे केले आहे. आपटे यांनी आज (गुरुवार) एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे मतदारांना तर आवाहन केलेच, त्याचबरोबर विरोधकांवरही निशाणा साधला. त्यांनी… Continue reading मी ‘गोकुळ’च्या रिंगणातच… अफवांवर विश्वास ठेवू नका ! : रवींद्र आपटे

error: Content is protected !!