कोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक डॉ. व्ही. टी. पाटील यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणाऱ्या ‘स्मृतिमोहोर’ या जयश्री दानवे लिखित एकांकिकेच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतीकुमार पाटील यांच्या हस्ते झाले.

जयश्री दानवे यांचे हे ३२ वे पुस्तक असून, यावेळी त्यांनी पुस्तकाच्या १००० प्रती ताराराणी संस्थेला देणगी स्वरूपात सप्रेम भेट दिल्या. व्ही. टी. पाटील सभागृहात झालेल्या प्रकाशन समारंभास प्रा. शेळके, माजी प्राचार्य गोडसे,  राजदर्शन दानवे, मुख्याध्यापिका शोभा चौधरी, उपमुख्याध्यापिका वैशाली जमेनीस आदी उपस्थित होते.