‘दिवाळी अंक’ : साहित्यातील श्रीमंतीची अनुभूती

जिज्ञासा आणि व्यक्त होणे हा मानवी गुण. या दोन्हीला सकारात्मक.. शुभंकर वळण दिले ते मराठी दिवाळी अंकानी. मराठी साहित्य संमेलन आणि मराठी दिवाळी अंक ही मराठी माणसाची जागतिक पातळीवर नोंद घेतली जाणारी वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. दिवाळी म्हणजे ‘दिवाळी अंक’ हे आनंदाचे अतूट नाते जुळलेय ते चक्क १८८५ पासून. १८८५ पूर्वीही दोन दिवाळी विशेष अंक निघाले… Continue reading ‘दिवाळी अंक’ : साहित्यातील श्रीमंतीची अनुभूती

नाटककार महेश एलकुंचवार यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

मुंबई (प्रतिनिधी) : प्रसिद्ध नाटककार, पटकथाकार, लेखक, निबंधकार, अभिनेते आणि प्रा. महेश एलकुंचवार यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. टाटा समूहातर्फे आयोजित केला जाणाऱ्या साहित्य महोत्सवात हा पुरस्कार दिला जाणार आहे. महेश एलकुंचवार हे भारतातील सर्वात प्रभावशाली साहित्यिक म्हणून ओळखले जातात. भारतीय रंगभूमीवरील महान नाटककार म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे. ‘यातनाघर’, ‘वासनाकांड’, ‘गार्बो’, ‘वाडा चिरेबंदी’… Continue reading नाटककार महेश एलकुंचवार यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

विजयाराणी पाटील यांच्या ‘महाराणी जिजाबाई’ पुस्तकाचे प्रकाशन

कोल्हापूर (प्रतिनिधी) शिवाजी विद्यापीठाच्या कै. शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनाच्या वतीने ‘महाराणी जिजाबाई : कोल्हापूर राज्याच्या रक्षणकर्त्या’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संयोगिता राजे छत्रपती यांच्या हस्ते विद्यापीठाच्या वस्तू संग्रहालयात पार पडला. करवीरच्या छत्रपती जिजाबाई या छत्रपती ताराराणी यांच्या स्नुषा. त्यांनी कोल्हापूर राज्याचे संरक्षण केले. काही कुणबीणींना प्रशासनाची जबाबदारी दिली, त्यांनी सती बंदीचा कायदा केला. परंतु, अशा… Continue reading विजयाराणी पाटील यांच्या ‘महाराणी जिजाबाई’ पुस्तकाचे प्रकाशन

डॉ. तेजस्विनी देसाई यांच्या पुस्तकाचे १९ सप्टेंबर रोजी प्रकाशन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील डॉ. तेजस्विनी देसाई यांनी लिहिलेल्या ‘विज्ञानातील नोबेल शलाका’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवार, दि. १९ सप्टेंबर रोजी होत आहे. दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी ५ वाजता हा समारंभ होणार आहे. विज्ञान साहित्यामध्ये भर घालणाऱ्या या मराठी पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ शास्त्रज्ञ व लेखक डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या हस्ते होणार असून,… Continue reading डॉ. तेजस्विनी देसाई यांच्या पुस्तकाचे १९ सप्टेंबर रोजी प्रकाशन

जयश्री दानवे यांच्या ‘अभिनयांकित’ पुस्तकाचे प्रकाशन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठी चित्रपट- नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक आणि खलनायक म्हणून गाजलेले नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या ३७ व्या स्मृतीदिनानिमित्त त्यांची कन्या, लेखिका जयश्री दानवे लिखित ‘अभिनयांकित’ पुस्तकाचे प्रकाशन शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी. एम. हिर्डेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जी.पी. माळी आणि कमला कॉलेजचे मराठी विभागप्रमुख डॉ. सुजय पाटील उपस्थित… Continue reading जयश्री दानवे यांच्या ‘अभिनयांकित’ पुस्तकाचे प्रकाशन

डॉ. व्ही. एन. शिंदे यांना चिपळोणकर पुरस्कार जाहीर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : इंडियन फिजिक्स असोसिएशन या संस्थेच्या पुणे विभागाच्या वतीने मराठीतून विज्ञान प्रसाराच्या कार्यासाठी देण्यात येणारा प्रतिष्ठेचा प्रा. मो.वा. चिपळोणकर पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा विज्ञान साहित्यिक डॉ. व्ही.एन. तथा विलास शिंदे यांना जाहीर झाला आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागामध्ये ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या… Continue reading डॉ. व्ही. एन. शिंदे यांना चिपळोणकर पुरस्कार जाहीर

शाहू महाराजांनी सामाजिक समता रुजवली : डॉ. टी. एस. पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी साऱ्या देशाला समानतेचा मानवतेचा संदेश देऊन सामाजिक समता आणण्याचे काम केले. सगळा जातिभेद तोडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि बहुजन समाज एकच असल्याचे सिद्ध केले, असे  प्रतिपादन विचारवंत डॉ. टी. एस. पाटील यांनी केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षात ३१ ऑगस्ट १९५३ रोजी भटक्या विमुक्त जाती जमातींना… Continue reading शाहू महाराजांनी सामाजिक समता रुजवली : डॉ. टी. एस. पाटील

सचिन इनामदार यांच्या ‘स्वप्नसत्य’ची पुरस्कारासाठी निवड

पन्हाळा (प्रतिनिधी) : येथील संजीवन विद्यालयाचे ज्येष्ठ अध्यापक आणि वरिष्ठ समन्वयक सचिन इनामदार यांनी लिहिलेल्या ‘स्वप्नसत्य’ या कविता संग्रहाची दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे दिल्या जाणाऱ्या २०२१ मधील विशेष पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. दि. १८ सप्टेंबर २०२२ रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. गेल्या बावीस वर्षांपासून सातत्याने विविध वर्तमानपत्रे व… Continue reading सचिन इनामदार यांच्या ‘स्वप्नसत्य’ची पुरस्कारासाठी निवड

`दमसा`चे ग्रंथ पुरस्कार जाहीर, १८ सप्टेंबर रोजी वितरण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने देण्यात येणाऱ्या २०२१  मधील ग्रंथ पुरस्कारासाठी विजय जाधव, नीरज साळुंखे, शिवाजी सातपुते, रघुनाथ कडाकणे, रमजान मुल्ला, चंद्रकांत खामकर, संजय हळदीकर आदींच्या पुस्तकांची निवड करण्यात आली आहे. १८ सप्टेंबर रोजी पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. पुरस्कार प्राप्त पुस्तके आणि लेखक : देवदत्त पाटील पुरस्कार: विजय जाधव- पाऊसकाळ, (कादंबरी),… Continue reading `दमसा`चे ग्रंथ पुरस्कार जाहीर, १८ सप्टेंबर रोजी वितरण

सटीप श्री ज्ञानेश्वरी’ ग्रंथाचे २९ ऑगस्ट रोजी प्रकाशन

कोल्हापूर : येथील निष्ठावंत वारकरी, संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि उपासक डॉ. बळवंत तुरंबेकर यांनी संपादित केलेल्या ‘सटीप श्रीज्ञानेश्वरी’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा सोमवार, दि. २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन येथे होणार आहे. महाराष्ट्राच्या धार्मिक व सांस्कृतिक जीवनात संत परंपरेला व संत साहित्याला महत्त्वाचे स्थान आहे. श्रीज्ञानेश्वरी अथवा भावार्थदीपिका… Continue reading सटीप श्री ज्ञानेश्वरी’ ग्रंथाचे २९ ऑगस्ट रोजी प्रकाशन

error: Content is protected !!