‘स्कील’ सर्वच घटकांसाठी मार्गदर्शक ठरेल : कुलगुरू डॉ. शिर्के

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कौशल्य निर्मिती आणि विकास या क्षेत्रांमध्ये डॉ. आण्णासाहेब गुरव प्रभावी कामगिरी बजावत आहेत. त्यांच्या अनुभवातून निर्माण झालेले ‘स्कील’ पुस्तक निश्चितपणाने सर्वच घटकांसाठी उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी काल येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभागातील प्राध्यापक आणि कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ. आण्णासाहेब… Continue reading ‘स्कील’ सर्वच घटकांसाठी मार्गदर्शक ठरेल : कुलगुरू डॉ. शिर्के

लक्ष्मीकांत देशमुख यांचा राजीनामा

पुणे (प्रतिनिधी) : ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाला दिलेला राज्य पुरस्कार रद्द केल्यानंतर सुरू झालेल्या राजीनामा सत्राचा सिलसिला बुधवारीही कायम राहिला. भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी पुरस्कार रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध करत आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या भूमिकेला समर्थन देत समितीचे सदस्य डॉ. विवेक घोटाळे यांनीही राजीनामा देत असल्याची घोषणा केली. ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’… Continue reading लक्ष्मीकांत देशमुख यांचा राजीनामा

एसटी कर्मचारी पुन्हा आक्रमक

मुंबई (प्रतिनिधी) : एसटी कर्मचाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी अनेक मागण्यांसाठी आंदोलन केले होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या आणि आंदोलन स्थगित झाले. मध्यंतरी या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली. त्याचदरम्यान राज्य सरकारने पगारवाढ देऊनही एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाची मागणी लावून धरली. याच पार्श्वभूमीवर विलीनीकरणाचे गाडे पुढे न सरकल्याने एसटी कर्मचारी पु्न्हा एकदा संप करण्याच्या तयारीत… Continue reading एसटी कर्मचारी पुन्हा आक्रमक

जिल्हा ग्रंथोत्सवात विविध साहित्यिक कार्यक्रमांची पर्वणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने दि. ९ व १० डिसेंबर रोजी जिल्हा ग्रंथोत्सव-२०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध साहित्यिक कार्यक्रमांची पर्वणी असणार आहे. या ग्रंथोत्सव सोहळ्यासाठी जिल्ह्यातील साहित्यप्रेमी, ग्रंथप्रेमी, वाचक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा ग्रंथोत्सव जिल्हा… Continue reading जिल्हा ग्रंथोत्सवात विविध साहित्यिक कार्यक्रमांची पर्वणी

सीमावाद प्रश्नी ठाकरे गटाकडून पुण्यात आंदोलन

पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात सीमाप्रश्नावरुन सुरु असलेल्या शाब्दिक वादाने आता हिंसक वळण घेतले आहे. त्याचदरम्यान बेळगावातील राडाचे पुण्यात पडसाद उमटू लागले आहे. यावेळी पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात जोरदार राडा देखील झाला आहे.  कन्नड संघटनांनी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक केली आहे. यावेळी काही कार्यकर्त्यांनी ट्रकवर झेंडे मिरवले. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. बेळगावमध्ये… Continue reading सीमावाद प्रश्नी ठाकरे गटाकडून पुण्यात आंदोलन

ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांचे पुण्यात निधन

पुणे (प्रतिनिधी) : ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले (वय ७४) यांचे पुण्यात निधन झाले. कथा, कादंबरी आणि समीक्षा अशा विविध अंगांनी त्यांनी मराठीत लेखन केले आहे. चिपळूण येथे २०१२ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे विभागप्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्षं काम केले होते. गेल्या काही महिन्यांपूर्वी… Continue reading ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांचे पुण्यात निधन

मुरलीधर देसाई यांच्या ‘माझी भ्रमंती’ला पुरस्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : माजी सैनिक आणि ज्येष्ठ लेखक मुरलीधर दादोजीराव देसाई यांच्या ‘माझी भ्रमंती’ या पुस्तकाला माजी सैनिक कल्याण पुणे विभागाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्य शासनाच्या माजी सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्यातर्फे उत्कृष्ट ग्रंथास दरवर्षी पुरस्कार दिला जातो. देसाई यांच्या ‘माझी भ्रमंती’ या पुस्तकास ‘उत्कृष्ट ग्रंथ’ पुरस्कार मिळाला आहे. रोख दहा हजार रुपये आणि… Continue reading मुरलीधर देसाई यांच्या ‘माझी भ्रमंती’ला पुरस्कार

नाट्यस्पर्धेतून प्रकाशदूतांच्या अंगभूत कलेचा अविष्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘कलानगरी’ कोल्हापुरात नाट्यकला सादर करण्याची संधी मिळणे ही गौरवाची बाब आहे. या नाट्यस्पर्धेच्या माध्यमातून प्रकाशदूतांच्या अंगभूत कलेचा अविष्कार होत असल्याचे प्रतिपादन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले. महावितरणच्या राज्यस्तरीय आंतर प्रादेशिक विभाग नाट्यस्पर्धा २०२२-२३ ‘नाट्यरंजन’चे उदघाटन दि. १० नोव्हेंबर रोजी नाळे यांचे हस्ते झाले. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित या दोन… Continue reading नाट्यस्पर्धेतून प्रकाशदूतांच्या अंगभूत कलेचा अविष्कार

मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी न्या. नरेंद्र चपळगावकर

वर्धा (वृत्तसंस्था) : येथे होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक, विचारवंत न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची आज निवड झाली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. विदर्भ साहित्य संघाचे यंदा शताब्दी वर्ष असल्यामुळे मराठी साहित्य संमेलन विदर्भात व्हावे अशी मागणी होत होती. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान विदर्भ… Continue reading मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी न्या. नरेंद्र चपळगावकर

दुबई विचार महोत्सवाचे गिरीश फोंडेंना निमंत्रण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दुबई येथे धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त होणाऱ्या ‘दुबई विचार महोत्सव २०२२’ या आंतरराष्ट्रीय संमेलनामध्ये गिरीश फोंडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार यावर आपले विचार मांडणार आहेत. त्याकरिता ते नुकतेच दुबईला रवाना झाले आहेत. ३० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या संमेलनाचे उद्घाटन हे पुरोगामी विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे करणार आहेत तर संमेलनाचे अध्यक्ष हे लेखक… Continue reading दुबई विचार महोत्सवाचे गिरीश फोंडेंना निमंत्रण

error: Content is protected !!