कोल्हापूर (प्रतिनिधी) : माजी सैनिक आणि ज्येष्ठ लेखक मुरलीधर दादोजीराव देसाई यांच्या ‘माझी भ्रमंती’ या पुस्तकाला माजी सैनिक कल्याण पुणे विभागाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

राज्य शासनाच्या माजी सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्यातर्फे उत्कृष्ट ग्रंथास दरवर्षी पुरस्कार दिला जातो. देसाई यांच्या ‘माझी भ्रमंती’ या पुस्तकास ‘उत्कृष्ट ग्रंथ’ पुरस्कार मिळाला आहे. रोख दहा हजार रुपये आणि प्रशस्तीपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. १६ डिसेंबर रोजी महासैनिक दरबार हॉल येथे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

देसाई यांना माजी सैनिक कल्याण विभागाचा हा तिसऱ्यांदा पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी त्यांच्या अन्य दोन पुस्तकांना हा सन्मान प्राप्त झाला आहे. या शिवाय त्यांना सामाजिक संस्थांचे आणि शासनाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.