मातोश्रीतून पळून गेलेल्या उद्धव ठाकरेंना मीच परत आणलं ;  नारायण राणेंचा दावा

रत्नागिरी : भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नारायण राणे यांनी केंद्रात मंत्रिपद मिळवलं.नारायण राणे आणि उद्धव ठाकरे याचं शाब्दिक युद्ध हे नेहमीच चालू असत. दोघेही एकमेकांवर टीका करत असतात. राणे ठाकरेंबाबत काही खळबळजनक दावे देखील करतात. आता रत्नागिरीतील सभेत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंबाबत आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. “उद्धव ठाकरे यांनी आयुष्यात सर्वात जास्त त्रास … Continue reading मातोश्रीतून पळून गेलेल्या उद्धव ठाकरेंना मीच परत आणलं ;  नारायण राणेंचा दावा

सांगलीत वंचितच्या पाठिंब्याने विशाल पाटलांचं बळ वाढलं

सांगली : सांगली लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. कॉंग्रेस नेते विशाल पाटील हे अपक्ष निवडणूक लढत आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या अडचणी वाढलेल्या असताना आता वंचित बहुजन आघाडीने सांगली लोकसभेत विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे सांगलीत विशाल पाटलांचे बळ वाढले आहे.काही दिवसांपूर्वीच विशाल पाटील यांचे… Continue reading सांगलीत वंचितच्या पाठिंब्याने विशाल पाटलांचं बळ वाढलं

शिरूरमध्ये अमोल कोल्हेंची डोकेदुखी वाढणार; अपक्ष उमेदवाराला मिळालं तुतारी चिन्ह

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. बारामती माढा लोकसभा मतदार संघात अपक्ष उमेदवारांना तुतारी चिन्ह मिळाल्याने संभ्रम निर्माण झाला होता. यानंतर आता शिरूर मध्येही हाच पेच निर्माण झाला आहे. शिरुर मतदारसंघातही अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह मिळाले आहे. शिरुर लोकसभेत मनोहर वाडेकरांना तुतारी हे चिन्ह… Continue reading शिरूरमध्ये अमोल कोल्हेंची डोकेदुखी वाढणार; अपक्ष उमेदवाराला मिळालं तुतारी चिन्ह

पंकजा मुंडेंच्या अडचणी वाढणार ; ‘या’नेत्याचा महाविकास आघाडीला पाठींबा

बीड : निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत सुरेश नवले यांनी  काही दिवसांपूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेला रामराम केला होता.आता त्यांनी बीडमधून महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढवीत असलेल्या बजरंग सोनवणे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.सुरेश नवले हे माजी मंत्री असून त्यांची बीडमध्ये मोठी ताकत आहे.त्यांच्या पाठिंब्याने महाविकास आघाडीची ताकद वाढली असून महायुतीला याठिकाणी मोठा झटका… Continue reading पंकजा मुंडेंच्या अडचणी वाढणार ; ‘या’नेत्याचा महाविकास आघाडीला पाठींबा

मोदी बलात्कार आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीसाठी मत मागतायेत ; संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई: देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवन्ना यांच्या कथित सेक्स स्कँडल प्रकरणामुळे कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. प्रज्वल रेवन्ना यांच्यावर लैंगिक छळप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेवन्ना यांनी त्यांच्या मोबाइल फोनमधून शेकडो सेक्स व्हिडीओ बनवल्याचा आरोप आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी… Continue reading मोदी बलात्कार आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीसाठी मत मागतायेत ; संजय राऊतांचा हल्लाबोल

महाराष्ट्राचे महानालायक म्हणत बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाना…

मुंबई : सोलापूरमधील सभेत पंतप्रधान मोदींवर टीका करताना उद्धव ठाकरेंनी शिवसेनेला नकली म्हणाल्याचा मुद्दा उपस्थित करत ‘नकली म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे का?’ असा टोला लगावला होता. तर देवेंद्र फडणवीस यांनी मोदींनी लस दिल्याने आपण जिवंत असल्याचं विधान केलं होतं त्यावरुनही उद्धव ठाकरेंनी टोला लगावताना ‘मोदींनी लस बनवली मग संशोधक काय गवत उपटत होते… Continue reading महाराष्ट्राचे महानालायक म्हणत बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाना…

शिंदे गटाकडून उत्तर पश्चिम मुंबईची उमेदवारी जाहीर ; ‘या’ शिवसैनिकाला दिली संधी

मुंबई : शिवसेना शिंदे गटाने आज उत्तर पश्चिम मुंबईची उमेदवारी जाहीर केली आहे. ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेले रवींद्र वायकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर आणि रवींद्र वायकर यांच्यात हा सामना रंगणार आहे. शिवसेनेचे कट्टर नेते रविंद्र वायकर यांनी गेल्या महिन्यांत शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर… Continue reading शिंदे गटाकडून उत्तर पश्चिम मुंबईची उमेदवारी जाहीर ; ‘या’ शिवसैनिकाला दिली संधी

गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय : संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई : पुण्यात काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी ‘भटकती आत्मा’ असा उल्लेख करत शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले होते. यानंतर पंतप्रधान मोदींच्या या टीकेचा प्रतिवाद करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते पुढे सरसावले आहेत. मोदींच्या या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नवीन… Continue reading गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय : संजय राऊतांचा हल्लाबोल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी धनगर समाजाचे नेते आण्णासाहेब डांगेंची घेतली भेट..!

सांगली ( प्रतिनिधी ) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाचे नेते माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन येऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने धैर्यशील माने यांच्याबाबत बंद खोलीत चर्चा केली. यावेळी आण्णासाहेब डांगे म्हणाले . धनगर समाजाचे अनेक प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत . त्यांची… Continue reading मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी धनगर समाजाचे नेते आण्णासाहेब डांगेंची घेतली भेट..!

काँग्रेसचा पंजा बदला नाहीतर पोलीस दलाच्या बोधचिन्हातील पंजा…; मनसेची मागणी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली नाही. पण त्यांनी महायुतीला पाठींबा दिला आहे. तसेच मनसेकडून महायुतीच्या उमेदवारांचा त्यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू आहे. यातच मनसेने काँग्रेस पक्षाचे पंजा हे चिन्ह बदला किंवा पोलीस दलाच्या बोधचिन्हांमध्ये असलेला पंजा काढून टाका अशी मागणी करत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे… Continue reading काँग्रेसचा पंजा बदला नाहीतर पोलीस दलाच्या बोधचिन्हातील पंजा…; मनसेची मागणी

error: Content is protected !!