बेळगाव: शेट्टर सासरे, सून फॉर्मुला भाजपाला ठरणार नुकसानदायक..!

बेळगाव ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार कोण? याची चाचपणी सुरु असताना जनतेला काय वाटते याचा आढावा घेतला असता सध्या शेट्टर सासरे सुन या फॉर्मुल्यात भाजपने अडकणे नुकसानदायक ठरू शकते असे चित्र पाहायला मिळत आहे. भाजपाला विजय मिळवायचा असल्यास सर्वसमावेशक चेहऱ्याची गरज आहे. अन्यथा या जागेवर पाणी सोडावे लागेल असे वातावरण निर्माण झाले आहे.… Continue reading बेळगाव: शेट्टर सासरे, सून फॉर्मुला भाजपाला ठरणार नुकसानदायक..!

बेळगावात होतोय घराणेशाहीला विरोध: भाजपच्या गोटात खळबळ

बेळगाव ( वृत्तसंस्था ) लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत चालली तसतशी वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत सध्या घराणे शाळेतील उमेदवारांच्या संदर्भातील चर्चा जोरात रंगत आहेत. विशेषत: भाजपमधील सामान्य कार्यकर्त्यात खळबळ निर्माण झाली आहे. भाजपाने यावेळी कोणत्याही पद्धतीने घराणेशाहीला प्राधान्य देऊ नये अशा प्रकारची प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे. चारशे पार करण्याचा विडा… Continue reading बेळगावात होतोय घराणेशाहीला विरोध: भाजपच्या गोटात खळबळ

‘पाकिस्तान झिंदाबाद’ घोषणांचा आरोप खरा ठरल्यास कठोर कारवाई करणार -मुख्यमंत्री सिद्धरामय्या

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचा आरोप कर्नाटक भाजपने नुकताच केला आहे. यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी विधानसभेत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचा आरोप तपासात खरा ठरला तर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले. भारतीय जनता पक्षाने (भाजप) या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असून बुधवारी बेळगावी, चित्रदुर्ग आणि मंड्यासह राज्यातील अनेक… Continue reading ‘पाकिस्तान झिंदाबाद’ घोषणांचा आरोप खरा ठरल्यास कठोर कारवाई करणार -मुख्यमंत्री सिद्धरामय्या

मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा द्या; बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाने केला ठराव..!

बेळगाव ( प्रतिनिधी ) मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे एका ठरावाद्वारे करण्यात आली. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे प्रयत्न करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे. पत्रकार संघातर्फे मंगळवारी मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ही मागणी करण्यात आली. प्रारंभी कार्यकारिणीचे ज्येष्ठ सदस्य सदानंद सामंत यांच्या हस्ते… Continue reading मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा द्या; बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाने केला ठराव..!

बेळगावमधील ‘या’ कार्यकर्त्यांनी जपला मराठी धर्म

बेळगाव ( प्रतिनिधी ) 27 फेब्रुवारी रोजी कवी वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमीत्त मराठी भाषा दिवस साजरा केला जातो. बेळगाव बापट गल्लीतील श्री कालिका देवी युवक मंडळाच्यावतीने दर वर्षी हा मराठी भाषा दिन साजरा केला असून, यावेळी गल्लीतील पंच श्री गोपाळराव केसरकर यांच्या हस्ते कवी वि. वा शिरवाडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी… Continue reading बेळगावमधील ‘या’ कार्यकर्त्यांनी जपला मराठी धर्म

‘शांताई वृद्धाश्रमा’च्या आजी-आजोबांनी केली जीवाची मुंबई

बेळगाव ( प्रतिनिधी ) आपल्या कुटुंबीयांपासून दुरावलेल्या आणि शांताई वृद्धाश्रमात आपल्या जीवनाचा उत्तरार्थ व्यतीत करत असलेल्या आजी-आजोबांनी चार दिवस अक्षरशा जीवाची मुंबई केली. बेळगाव- मुंबई-बेळगाव विमानाने प्रवास आणि चार दिवसात मुंबईतील धार्मिक आणि महत्त्वाच्या सुप्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेट, त्याचबरोबर सिद्धिविनायक आणि महालक्ष्मीचे दर्शन अशी ही आगळी वेगळी सहल त्या आजी आजोबांच्या जीवनातील संस्मरणीय सफर ठरली.… Continue reading ‘शांताई वृद्धाश्रमा’च्या आजी-आजोबांनी केली जीवाची मुंबई

”चोर्ला-अनमोड मार्गे गोव्याला जोडणाऱ्या रस्त्याचे काम युद्ध पातळीवर करा”

बेळगाव ( विशेष प्रतिनिधी ) बेळगाव आणि गोवा यांचे संबंध जुने आहेत. हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी बेळगाव ते गोव्याला जोडण्यासाठीचा मार्ग चांगल्या स्थितीत असण्याची गरज आहे. त्यासाठी चोरला आणि अनमोड मार्गे गोव्याला जोडणाऱ्या रस्त्याचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करा अशी मागणी बेळगाव ट्रेडर्स फोरमने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. गुरुवारी… Continue reading ”चोर्ला-अनमोड मार्गे गोव्याला जोडणाऱ्या रस्त्याचे काम युद्ध पातळीवर करा”

error: Content is protected !!