‘त्या’मुळेच केंद्र विरुद्ध पंजाब सरकार संघर्ष पेटणार…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मागील महिन्यात केंद्र सरकारद्वारे संमत करण्यात आलेल्या कृषि कायद्यांविरोधात देशभरातील विविध ठिकाणी अद्यापही आंदोलने सुरु आहेत. पंजाब, हरियाणा याचे केंद्रस्थान असतानाच या कायद्याविरोधात पंजाब सरकारने विधानसभेत प्रस्ताव संमत केला आहे. हा प्रस्ताव संमत करणारे पंजाब हे देशातील पहिले राज्य बनले आहे. यामुळे पंजाब सरकार आणि केंद्र सरकारविरुद्ध यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची… Continue reading ‘त्या’मुळेच केंद्र विरुद्ध पंजाब सरकार संघर्ष पेटणार…

राहुल गांधींनी माजी मुख्यमंत्र्यांना फटकारले, ‘असली भाषा चालणार नाही !’

वायनाड (वृत्तसंस्था) : कमलनाथ यांनी वापरलेली भाषा मला अजिबात आवडलेली नाही. असली भाषा चालणार नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना चांगलंच फटकारलं. कमलनाथ यांनी भाजपच्या उमेदवार आणि माजी मंत्री इमरती देवी यांच्याबद्दल ‘आयटम’ शब्द वापरल्यामुळे देशभर वाद निर्माण झाला होता. त्यावरून राहुल गांधी यांनी त्यांना ही समज दिली.… Continue reading राहुल गांधींनी माजी मुख्यमंत्र्यांना फटकारले, ‘असली भाषा चालणार नाही !’

‘त्या’ पत्रामुळे शिवसेना-भाजपाचे संबंध ताणले : अमित शहा

मुंबई (प्रतिनिधी) : मंदिरं, रामलीला, मदरसे यावरून भाजपनं सध्या ठाकरे सरकारविरुद्ध अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचे प्रयत्न भाजपकडून सातत्यानं सुरू आहेत. त्यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून सेक्युलर शब्दावरून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील संबंध ताणले गेले आहेत. या संबंधांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी भाष्य केले.… Continue reading ‘त्या’ पत्रामुळे शिवसेना-भाजपाचे संबंध ताणले : अमित शहा

केंद्र सरकारची डिजिटल मीडियाला मान्यता…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने नुकतेच डिजिटल मीडियाला मान्यता दिली आहे. परिणामी या माध्यमाच्या नियमनाचा मार्गही खुला केला आहे. यामुळे बातम्यांच्या वेबसाईटलाही सरकारी जाहिराती मिळणार आहेत. मुद्रित आणि दृकश्राव्य माध्यमांच्या धर्तीवर डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मलाही बातम्यांमध्ये शिस्त आणि शिरस्ता पाळण्यासाठी स्व- नियमन संस्था स्थापन करण्याची परवानगी दिली आहे. डिजिटल वृत्त माध्यमांत २६ टक्के प्रत्यक्ष परदेशी… Continue reading केंद्र सरकारची डिजिटल मीडियाला मान्यता…

मोदींच्या संपत्तीत वाढ…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकूण संपत्तीमध्ये वाढ झाली आहे. ३० जून रोजी मोदींची एकूण संपत्ती २.८५ कोटी रुपये झाली आहे. २०१९ च्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत यंदा तब्बल ३६ लाखांनी वाढ झाली आहे. त्यांनी कोणतेही कर्ज घेतलेले नाही. त्यांच्या नावावर एकही गाडी किंवा इतर वाहन नाही. ४५ ग्रॅम सोन्याच्या ४ अंगठ्या आहेत.… Continue reading मोदींच्या संपत्तीत वाढ…

कोल्हापुरात उद्या काँग्रेसची भव्य ‘शेतकरी बचाव रॅली’ व्हर्चुअल सभा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शेतकरी विरोधी कायद्यांना विरोध करण्यासाठी उद्या (गुरुवारी) १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यात ६ ठिकाणी भव्य ‘शेतकरी बचाव रॅली’ व्हर्चुअल सभेचे आयोजन केले आहे. या रॅलीमध्ये सहभागी शेतकऱ्यांशी कॉग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी ह्या ऑनलाईन संवाद साधणार आहेत. यातील एक सभा कोल्हापूरात जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये सायंकाळी ४ वा. मर्यादित शेतकऱ्यांच्या उपस्थितीत होणार… Continue reading कोल्हापुरात उद्या काँग्रेसची भव्य ‘शेतकरी बचाव रॅली’ व्हर्चुअल सभा

‘आयफोन’ची बारावी सिरीज आज होणार लाँच

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्मार्टफोन क्षेत्रातली दिग्गज कंपनी अॅपल आज iPhone १२ सिरीज लाँच करण्याची  शक्यता आहे. कंपनी या सिरीजमध्ये एकाचवेळी चार फोन बाजारात आणणार आहे. हा एक ऑनलाईन इव्हेंट असणार असून याची सुरुवात भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजता होणार आहे. हा इव्हेंट अॅपलची वेबसाईट किंवा यूट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे. एका रिपोर्टनुसार कंपनी चार… Continue reading ‘आयफोन’ची बारावी सिरीज आज होणार लाँच

कोरोनाबाबत दिलासादायक बातमी..!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात मागील काही महिन्यांपासून दररोज लाखांच्या संख्येनं वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मागील २४ तासांतील कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी प्रसिद्ध केली असून, दीड महिन्यानंतर रुग्णसंख्येची नीचांकी नोंद झाली आहे. एकूण रुग्णसंख्या ७१ लाख ७५ हजार ८८१ वर पोहोचली असली, तरी प्रत्यक्षात ६२ लाख २७ हजार… Continue reading कोरोनाबाबत दिलासादायक बातमी..!

‘दलबदलू’ अभिनेत्रीचा काँग्रेसला रामराम ! 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या ‘दलबदलू’ प्रतिमेसाठी विख्यात, मात्र तमिळनाडूमध्ये अतिशय लोकप्रिय असलेली अभिनेत्री खुशबू सुंदर हिने काँग्रेसला रामराम करीत हाती ‘कमळ’ घेतले आहे. आज (सोमवार) त्यांनी नवी दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. यानंतर त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. खुशबू या हिशेबी राजकारणासाठी पटाईत आहेत. त्यांनी… Continue reading ‘दलबदलू’ अभिनेत्रीचा काँग्रेसला रामराम ! 

पुलवामामधील सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; २ जवान शहीद

श्रीनगर (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीर भागात सुरु असणाऱ्या दहशतवादी हालचाली काही कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. आज (सोमवारी) काही दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ११० बटालियनवर बेछूट गोळीबार केला. जम्मू काश्मीर पोलिसांच्या साथीने ही जवानांची तुकडी पुलवामा जिल्ह्यातील पंपोरच्या कंदीझल पूलापाशी रोड ओपनिंग ड्युटीसाठी तैनात होती. माहितीनुसार दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात २ जवान शहीद झाले आहेत.… Continue reading पुलवामामधील सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; २ जवान शहीद

error: Content is protected !!