राहुल गांधी शहिदजादे, तर जय शहा शहजादा : पवन खेरा

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तोंड उघडले की वाद निर्माण होत आहेत. १० वर्षातील कामाचे लेखा जोखा नसल्याने लोकांना सांगण्यासाठी त्यांच्याकडे मुद्देच राहिलेले नाहीत. नरेंद्र मोदी, हिंदू मुस्लीम करत नाही असे सांगतात व दुसऱ्याच दिवशी पुन्हा हिंदू मुस्लीमवर भाषण देतात. नरेंद्र मोदींचा प्रचार भरकटला असून मुद्देच नसल्याने मोदींना धार्मिक ध्रुवीकरणावर भर द्यावा… Continue reading राहुल गांधी शहिदजादे, तर जय शहा शहजादा : पवन खेरा

इंडिया आघाडी 4 जून रोजी नवीन सरकार स्थापन करेल : मल्लिकार्जुन खर्गे

लखनऊ : जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठवणी करण्याचा निर्णय घेतला असून इंडिया आघाडी 4 जून रोजी नवीन सरकार स्थापन करेल असा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी लखनऊमध्ये केला. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले ,”निवडणुकीचे चार… Continue reading इंडिया आघाडी 4 जून रोजी नवीन सरकार स्थापन करेल : मल्लिकार्जुन खर्गे

तेलंगना उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला केली ‘ही’ सूचना

तेलंगना : 1951च्या लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 60 नुसार पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्यास पात्र म्हणून कोणत्याही वर्गाला सूचित करण्याचा अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला आहे. 85 वर्षांपेक्षा अधिक वय असणार्‍या ज्‍येष्‍ठ नागरिकांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाची परवानगी देण्‍यात आली आहे. तशीच तरतूद केंद्रीय निवडणूक आयोगाने गर्भवती महिलांसाठी करावी. त्‍यांनाही पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावण्‍याची परवानगी देण्‍यात यावी.याबाबत अधिसूचना… Continue reading तेलंगना उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला केली ‘ही’ सूचना

न्यूज क्लिकच्या संपादकांची अटक बेकायदेशीर ; तात्काळ सुटका करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

दिल्ली : न्यूज क्लिकचे एडिटर-इन-चीफ प्रबीर पुरकायस्थ यांना सर्वोच्च न्यायालायने मोठा दिलासा दिला आहे. प्रबीर पुरकायस्थ यांची अटक आणि रिमांड अवैध असल्याचे कोर्टाने म्हंटले आहे. प्रबीर पुरकायस्थ यांच्यावर काही दिवसांपूर्वी युपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी युपीए अंतर्गत केलेल्या कारवाईला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च… Continue reading न्यूज क्लिकच्या संपादकांची अटक बेकायदेशीर ; तात्काळ सुटका करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

माझेही मुस्लीम मित्र पण…; नरेंद्र मोदींचं विधान

Koderma, May 14 (ANI): Prime Minister Narendra Modi addresses during a public meeting for the Lok Sabha polls, in Koderma on Tuesday. (ANI Photo)

वाराणसी  : माझे शासन मॉडेल धर्म किंवा जातीच्या आधारावर आधारलेलं नाही, “मी लहानपणी मुस्लिम कुटुंबात राहिलो आहे. माझे अनेक मुस्लिम मित्र आहेत. पण 2002 नंतर माझी प्रतिमा डागाळण्याचे प्रयत्न करण्यात आले”, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.काल नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी एका खासगी वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. गेल्या… Continue reading माझेही मुस्लीम मित्र पण…; नरेंद्र मोदींचं विधान

पटेलांकडून नव्या वादाला तोंड ; मोदींना घातला महाराजांचा जिरेटोप

वाराणशी : देशात लोकसभा निवडणूकीचे वातावरण तापले असतानाच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे.आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रफुल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरे टोप घालून त्यांचं स्वागत केलं. यानंतर आता विविध स्तरातून पटेल… Continue reading पटेलांकडून नव्या वादाला तोंड ; मोदींना घातला महाराजांचा जिरेटोप

भाजपनं उद्योगपतींना जमिनी देऊन आदिवासींवर अन्याय केला :  प्रियंका गांधी

मुंबई-नंदूरबार : आदिवासी समाजाच्या विकासासाठी काँग्रेस पक्षाने सातत्याने काम केले आहे. पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी आदिवासी समाजाला जल, जंगल, जमिनचा अधिकार दिला. काँग्रेस सरकारने पेसा कायदा आणला तर राजीव गांधी यांनी पंचायत राज कायदा आणून अधिकार दिले. परंतु भाजपाची विचारधारा याच्या उलट आहे. भाजपा आदिवासी संस्कृती बदलण्याचा प्रयत्न करत आहे. आदिवासींच्या जमिनी उद्योगपतींना दिल्या जात… Continue reading भाजपनं उद्योगपतींना जमिनी देऊन आदिवासींवर अन्याय केला :  प्रियंका गांधी

राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांच्या घरावर छापेमारी; कोल्हापुरात एकच खळबळ

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय जयसिंगराव पाटील यांच्या कोल्हापुरातील तीन घरांवर छापे टाकून झडती घेतली असता या कारवाईत पथकाने पाटील यांच्या घरातून 28 तोळे सोने, एक अलिशान कार आणि दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क… Continue reading राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांच्या घरावर छापेमारी; कोल्हापुरात एकच खळबळ

कुठं यायचं ते सांग, आम्ही यायला तयार; ओवैसींनी नवनीत राणांचं आव्हान स्वीकारलं

हैद्राबाद : नवनीत राणा यांचा हैद्राबादच्या भाजपच्या उमेदवार माधवी लता यांच्या प्रचार सभेत बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये नवनीत राणा या ओवैसींविषयी बोलताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये नवनीत राणा यांनी ’15 सेकंदांसाठी पोलिसांना हटवा, छोट्याला (अकबरुद्दीन ओवेसी) आणि मोठ्याला (असदुद्दीन ओवेसी) ते कुठून आले आणि कुठे गेले हे कळणार नाही, असे म्हणत राणा यांनी… Continue reading कुठं यायचं ते सांग, आम्ही यायला तयार; ओवैसींनी नवनीत राणांचं आव्हान स्वीकारलं

कॉंग्रेसला काळा पैसा देणाऱ्या अदानी-अंबानींवर ईडीने कारवाई करावी : संजय राऊत

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती गौतम अदाणी आणि मुकेश अंबानी यांच्यासह काँग्रेसवर आर्थिक गैरव्यहाराचे आरोप केले आहेत. या आरोपांनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी ईडीने गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.दरम्यान संजय रूट यांनी बोलताना, ईडीने पंतप्रधानांचं, एका जबाबदर व्यक्तीचं हे वक्तव्य अधिकृत जबाब मानून… Continue reading कॉंग्रेसला काळा पैसा देणाऱ्या अदानी-अंबानींवर ईडीने कारवाई करावी : संजय राऊत

error: Content is protected !!